उद्याेग जननी कमल पुरस्कारांचे वितरण

समस्या ही प्रगतीची पायरी असते. अनेकांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत असल्याने सामूहिक प्रयत्नांनी ते यश प्राप्त हाेत असते. -डॉ. सिथा
उद्याेग जननी कमल पुरस्कारांचे वितरण
उद्याेग जननी कमल पुरस्कारांचे वितरण

पुणे : महिला बचत गटांनी आणि महिला शेतकऱ्यांनी केलेले काम अभिनंदनीय असून, बचत गटांतील महिलांचे मार्केटिंगचे तंत्र आम्हाला शिकण्यासारखे आहे. विविध समस्यांना सामाेरे जात महिलांनी उद्याेग यशस्वी करून दाखविला आहे, असे प्रतिपादन इस्त्राेच्या प्रकल्प संचालिका डॉ. एस. सिथा यांनी केले.

प्रवीण मसालेवाले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे उद्याेग जननी कमल पुरस्कार शनिवारी (ता. १६) डॉ. सिथा यांच्या हस्ते प्रदान करण्यात अाले. यावेळी महापाैर मुक्ता टिळक, ट्रस्टचे हुकूमचंद चाेरडिया, आनंद चाेरडिया, विशाल चाेरडिया, मधुबाला चाेरडिया आदी उपस्थित हाेते.

डॉ. सिथा म्हणाल्या, की समस्या ही प्रगतीची पायरी असते. आम्ही देखील विविध समस्यांवर मात करत विविध उपग्रह माेहिमा यशस्वी करत असताे. अनेकांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत असल्याने सामूहिक प्रयत्नांनी ते यश प्राप्त हाेत असते.

महापाैर टिळक म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या वतीने महापाैर बचत बाजार शहराच्या विविध भागांमध्ये उभारण्यात येणार आहेत. शासनाने प्लॅस्टिकवर बंदीचा निर्णय घेतला अाहे. यामुळे व्यवसायाची नवीन संधी महिला बचत गटांना मिळणार अाहे. यासाठी प्रवीण मसालेवाले ट्रस्टने पुढाकार घ्यावा.

यावेळी पुणे विभागाचा पुरस्कार स्पार्क इंजिनिअर्सच्या संचालिका सुनीता पाटसकर, उर्वरित महाराष्ट्र विभागाचा पुरस्कार वरुण ॲग्राेच्या संचालिका मनीषा धात्रक, सेंद्रिय महिला शेतकरी पुरस्कार मनीषा पाटील, उत्कृष्ट बचत गट पुरस्कार अभिनव महिला बचत गटाच्या पूजा बाेडके आणि अरुणा शेळके आणि विशेष सन्मान व्ही. एन. ठक्कर हिंगवालाच्या संचालिका शैला ठक्कर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार चाेरडिया, स्वागत श्‍वेता चाेरडिया यांनी केले. तर आभार गाैरी चाेरडिया यांना मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com