agriculture news in marathi, pre kharip planning meeting, solapur, maharashtra | Agrowon

खते, बियाणेपुरवठा वेळेत करा : पालकमंत्री देशमुख
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 एप्रिल 2018

सोलापूर   : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि वीज यांचा पुरवठा वेळेत होईल याबाबत दक्षता घेतली जावी, अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी येथे दिल्या.

पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक सोमवारी (ता. ९) झाली. या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात झालेल्या या बैठकीस सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, आमदार बबनराव शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, विभागीय कृषी सहसंचालक विजय इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार उपस्थित होते.  

सोलापूर   : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि वीज यांचा पुरवठा वेळेत होईल याबाबत दक्षता घेतली जावी, अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी येथे दिल्या.

पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक सोमवारी (ता. ९) झाली. या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात झालेल्या या बैठकीस सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, आमदार बबनराव शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, विभागीय कृषी सहसंचालक विजय इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार उपस्थित होते.  

पालकमंत्री देशमुख म्हणाले, की खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते आणि बियाणे वेळेवर मिळावीत या अनुषंगाने नियोजन करा. ई-पॉस मशिनद्वारे खत विक्री केली जाणार आहे. त्यासाठी पुरेशा मशिन उपलब्ध आहेत का, याबाबत खात्री करा. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महाबीज आणि इतर संस्थांकडून बियाणे वेळेवर उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी.

सहकारमंत्री देशमुख यांनी पतपुरवठा आराखड्यातील नियोजनानुसार राष्ट्रीय, सहकारी आणि ग्रामीण बॅंकांनी शेतीस पतपुरवठा करावा. ग्रामीण विभागीय बॅंकांकडून गेल्या दोन वर्षांत समाधानकारक पतपुरवठा झालेला नाही. यासाठी त्यांचे उद्दिष्ट्य कमी केले जावे. सोलापूर जिल्हा बॅंकेने शेतीसाठीच्या पतपुरवठ्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करावे, असे सांगितले.

आमदार शिंदे यांनी शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी निधीचे वाटप झाले नसल्याचे सांगितले. यावर प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र  शिंदे यांनी यासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी आला आहे. त्यापैकी ४१ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित निधीचेही एप्रिलअखेरपर्यंत वाटप करण्यात येईल, असे सांगितले.

श्री. बिराजदार यांनी प्रारंभी कृषी विभागाने खरीप हंगामासाठी केलेले नियोजन आणि विविध योजनांतून शेतकऱ्यांना देण्यात आलेले लाभ, अनुदान आणि फलनिष्पत्ती याबाबतचे सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी आपात्कालीन पीक नियोजन, जलयुक्त शिवार अभियान, गटशेती योजना याबाबतची माहिती दिली.

बैठकीस जलसंपदाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक प्रदीप झिले, प्रकल्प संचालक रवींद्र माने, सोलापूर जिल्हा बॅंकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे आदी उपस्थित होते.

 

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...