जळगाव, धुळ्यातील कपाशीला पावसाचा फटका
चंद्रकांत जाधव
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

आमच्या तालुक्‍यात अधिकचा पाऊस झाला आहे. कृषी सहायक, तलाठी आलेले नाहीत. यंत्रणा सक्षम नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वेळेत, हव्या त्या गतीने शासनापर्यंत पोचत नाहीत. नुकसानीची दखल शासनाने घ्यावी. 

- सचिन जगन्नाथ पाटील, शेतकरी, खेडी खेडगाव, जि. जळगाव.
जळगाव  ः मागील तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे जवळपास ३० हजार हेक्‍टरवरील पूर्वहंगामी कपाशीमधील बोंडे काळवंडली असून, सोयाबीन, ज्वारीला कोंब फुटतील की काय, अशी धास्ती निर्माण झाली आहे. कोरडवाहू कपाशीला पावसामुळे दिलासा मिळालेला असला, तरी इतर पिके हातची जाण्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा दिवाळीपूर्वीचा उत्साह कुठेही दिसत नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला यंत्रणा तोकडी असल्याने पंचनामे फारशा गतीने सुरू नाहीत. 
 
जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने विविध तालुक्‍यांमधून याबाबत अहवाल मागविला आहे. जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, भुसावळ, पारोळा, भडगाव येथे बुधवारीदेखील (ता.११) पाऊस झाला. चोपडा तालुक्‍यात मागील तीन दिवसांत ४०, जळगावात १८, चाळीसगावात सर्वाधिक ४१ आणि यावल व रावेरमध्ये १९ मिमी पाऊस झाला आहे. 
 
धुळे भागात ज्वारीचे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यात मागील तीन दिवसांत धुळे तालुक्‍यात मंगळवारपर्यंत (ता.१०) २२.४, साक्रीत ४.६ , शिरपुरात ३२.३ तर शिंदखेडा तालुक्‍यात १८.६ मिमी पाऊस झाला आहे. धुळ्यात पावसाचा कोरडवाहू कपाशी, मका या पिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु ज्वारी काळवंडू लागली आहे.
 
शिरपूर, शिंदखेडा, धुळे तालुक्‍यांतील पूर्वहंगामी कपाशीला फटका बसला आहे. नुकसानीमुळे खरीप पीकविमा योजनेतून पंचनामे करून भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसाची आकडेवारी कमी दिसत असली तरी काही भागांत अधिकचा पाऊस झाला. त्याचा फटका पिकांना बसला आहे. धुळेसह जळगाव जिल्ह्यात कृषी विभागाकडे बुधवारपर्यंत (ता.११) नुकसानीसंबंधीची माहिती आलेली नव्हती. अर्थातच यंत्रणा तोकडी आहे.
 
जळगाव जिल्ह्यात कृषी सहायकांची २३८ पदे रिक्त आहेत. धुळे जिल्ह्यातही १०० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. तलाठी कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे पंचनाम्यांची मागणी शेतकरी करीत असले तरी पंचनामे सुरू झालेले नाहीत, अशी माहिती आहे.

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
शेतशिवारांत लवकरच 'ड्रायव्हर' विना...पुणे : सर्जा-राजाच्या परंपरेने चालणाऱ्या भारतीय...
कतृर्त्वाचे उजळले दीप घरची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. शिक्षण पूर्ण...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...