agriculture news in marathi, pre monsoon cotton damage in varhad, maharashtra | Agrowon

वऱ्हाडात मॉन्सूनपूर्व कपाशीचे नुकसान
गोपाल हागे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017
माझ्या शेतातील कपाशीच्या झाडांवरील बोंड्या सडल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे झाडेही मोडली. यामुळे हंगामाच्या सुरवातीला एकरी तीन ते चार क्विंटल कापसाचे नुकसान झाले. या भागात असे नुकसानग्रस्त शेतकरी असंख्य आहेत. शासनाने याचा पंचनामा केला, तर वस्तुस्थिती किती बिकट आहे हे कळेल. 
- तुळशीराम खोटरे, कापूस उत्पादक शेतकरी, 
खापरखेड, ता. तेल्हारा जि. अकोला.
अकोला : गत आठवड्यात काही भागांत संततधार पाऊस झाल्याने मॉन्सूनपूर्व लागवड केलेल्या कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. झाडांवर लागलेल्या बोंड्या कुजल्याने पहिला वेचा नष्ट झाला आहे. दसऱ्यापासून या शेतकऱ्यांच्या घरात ‘पांढरे सोने’ (कापूस) यायला सुरवात झाली असती. परंतु हा पहिला बहर पूर्णपणे नष्ट झाला आहे.
 
वऱ्हाडात अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत काही तालुक्‍यांमध्ये प्री-मॉन्सून कपाशीची लागवड केली जाते. यात प्रामुख्याने अकोला जिल्ह्यात तेल्हारा, अकोट, अकोला तर बुलडाणा जिल्ह्यात संग्रापमूर, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर आदी तालुक्‍यांचा समावेश आहे. या वर्षी सुरवातीला पावसाची उघडीप कपाशीला बाधक ठरली होती. 
 
आता सप्टेंबरमध्ये गेल्याच आठवड्यात या भागात संततधार पाऊस झाला. त्याशिवाय सुमारे आठवडाभर ढगाळ वातावरण बनलेले होते. यामुळे कपाशीच्या झाडांवर लागलेल्या बोंड्या काळवंडल्या. प्रत्येक झाडावर १५ ते २० बोंड्या अशा काळवंडल्या असून, त्यावर बुरशी आली आहे. वास्तविक दसऱ्यापूर्वी शेतकरी ‘सीतादही’ (कापूस वेचणीचा प्रारंभ) करण्याच्या तयारीत होते. 
 
तेल्हारा तालुक्‍यातील खापरखेड हे गाव कापूस उत्पादनात अग्रेसर मानले जाते. शेतकऱ्यांनी या वर्षी लागवड केलेली कपाशी चांगली साधली होती. काहींनी भरउन्हात कपाशीची लागवड केली. त्यामुळे या शेतातून आता कापूस यायला सुरवात झाली असती. मात्र सध्या प्रचंड नुकसानाला शेतकरी सामोरे जात आहेत. खारपखेड येथील तुळशीराम ओंकार खोटरे यांनी तीन एकरात लावलेल्या संपूर्ण कपाशीचे नुकसान झाले.  खोटरे यांच्यासारखे असंख्य कापूस उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...