सिंधुदुर्गात माॅन्सूनपूर्व पाऊस

सिंधुदुर्गात माॅन्सूनपूर्व पाऊस
सिंधुदुर्गात माॅन्सूनपूर्व पाऊस

कणकवली ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी माॅन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. बहुतांशी गावांमध्ये पाऊस पोचला आहे. पहिल्या पावसात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या सुरू असलेल्या कामामुळे माती रस्त्यावर आल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. दुपारी चार नंतर पाऊस थांबला. दरम्यान, गडगडाटासह पाऊस झाल्याने वीज आणि दूरध्वनी सेवा तीन तास ठप्प झाली होती.

जिल्ह्यात गेले चार दिवस तुरळक पाऊस सुरू आहे. आजच्या पावसाचा मोठा फटका मुंबई गोवा महामार्गावरील वाहनचालकांना बसला. कसाल ते ओरोस यादरम्यान चौपदरीकरणासाठीचे मातीचे ढीग थेट रस्त्यावर आले. त्यामुळे डांबरी रस्ताच गायब झाला होता. यात वाहने नेमकी कुठल्या बाजूने चालवावीत याचाही संभ्रम वाहनचालकांना झाला होता. अखेर संथगतीने वाहने हाकत वाहनचालकांनी यातून मार्ग काढला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com