यंदा पाऊस, पीकपाणी समाधानकारक : सिद्धेश्‍वर मंदिरानजीक भाकणूक

यंदा पाऊस, पीकपाणी समाधानकारक
यंदा पाऊस, पीकपाणी समाधानकारक

सोलापूर  ः यंदा पावसाचे प्रमाण पुरेसे राहील. पीक परिस्थितीही चांगली राहील. शिवाय भयमुक्त आणि स्थिर वातावरण राहील, अशी भाकणूक सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेत करण्यात आली. मंगळवारी (ता. १५) रात्री अकराच्या सुमारास सिद्धेश्‍वर मंदिरानजीक ही भाकणूक पार पडली. 

दरवर्षी परंपरेप्रमाणे ही भाकणूक केली जाते. यंदाही ती करण्यात आली. यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी वासराला जेव्हा भाकणुकीसाठी आणले. तेव्हा त्याने प्रथम मूत्र विसर्जन केले. त्यामुळे यंदा पीक-पाणी चांगले राहणार असल्याचे हिरेहब्बू यांनी सांगितले. शिवाय हे वासरू या ठिकाणी आल्यानंतर कोणत्याही प्रकारे घाबरले नाही, त्यामुळे आगामी वर्षभरातील वातावरण हे भयमुक्त असेल, असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी सकाळी सिद्धेश्वर यांच्या विवाह सोहळ्यातील हळद काढण्याचा कार्यक्रम झाला. त्यानुसार नंदिध्वजांना सिद्धेश्‍वर तलावात स्नान घालण्यात आले. या विधीला ‘करिमुटगी’ असे म्हणतात. तलावातील स्नानानंतर सर्व नंदिध्वज पुन्हा हिरेहब्बू वाड्याकडे  मार्गस्थ झाले. दुपारी दोनच्या सुमारास वाड्यात आगमन झाले. सायंकाळी चारच्या सुमारास होम प्रदीपन सोहळ्यासाठी नंदिध्वज मिरवणूक निघाली. हा सोहळा पाहण्यासाठी दत्त चौक ते माणिक चौक या मार्गावर मोठी गर्दी झाली होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com