agriculture news in marathi, Prefer to use a safety kit during spraying | Agrowon

फवारणीवेळी सुरक्षा किट वापरण्याला प्राधान्य
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त (ता. १७) औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक शाळांनी प्रभातफेरीत सहभाग नोंदविला. या प्रभातफेऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागासह सर्व कृषी विक्रेत्यांच्या माध्यमातून गुलाबी बोंड अळी नियंत्रणाबाबत जनजागृती केली गेली. त्याचा सकारात्मक परिणाम फवारणीवेळी सुरक्षा किट वापरली जात असल्याचे पैठण तालुक्‍यात दिसून आले.

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त (ता. १७) औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक शाळांनी प्रभातफेरीत सहभाग नोंदविला. या प्रभातफेऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागासह सर्व कृषी विक्रेत्यांच्या माध्यमातून गुलाबी बोंड अळी नियंत्रणाबाबत जनजागृती केली गेली. त्याचा सकारात्मक परिणाम फवारणीवेळी सुरक्षा किट वापरली जात असल्याचे पैठण तालुक्‍यात दिसून आले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विविध शाळांच्या समन्वयातून राबविल्या गेलेल्या प्रभातफेरींमध्ये ५० पेक्षा जास्त कीटकनाशक कंपन्यांचे १४७ प्रतिनिधी, जवळपास ५२८ कृषी सेवा केंद्र चालकांनी, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, पंचायत समितीचे पदाधिकारी सदस्य, विविध गावचे ग्रामपंचायतचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांनी विविध ठिकाणी सहभाग नोंदविला.

 गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्काच्या फवारणीचा, डोम कळी नष्ट करण्याचा व कीटकनाशकाच्या सुरक्षित हाताळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत गावामध्ये जनजागृती करण्याचे काम केले. यासाठी काही घोषणा तयार करण्यात आल्या होत्या. प्रभातफेरीसमोर बॅनर व सुरक्षा किट घातलेला एक व्यक्ती ठेवून गावकऱ्यांमध्ये या सवयीबाबतची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न केला गेला. पैठण तालुक्‍यातील धनगाव शिवारात शेतकऱ्यांना फवारणीची किट वापरण्याचा सल्ला दिल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

आधी आम्ही फवारणीच्या वेळी सुरक्षेची कोणतीच साधने वापरत नव्हतो; परंतु मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी झालेल्या प्रबोधनामुळे आम्ही फवारणीच्या वेळी किट वापरण्याचे काम सुरू केले.
-राजू जाधव,
धनगाव, ता. पैठण. जि. औरंगाबाद

कीटनकनाशकाचा योग्य व परिणामकारक वापर, शिवाय फवारणी करतेवेळी घ्यावयाची काळजीसाठी मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी काढलेल्या प्रभातफेरींतून जागर केला. त्याचे प्रचंड सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. धनगाव शिवारात फवारणीवेळी सुरक्षा किट वापरणारे राजू जाधव केलेल्या जागृतीच्या परिणामाचे उदाहरण आहेत.
-आनंद गंजेवार,
कृषी विकास अधिकारी जि. प. औरंगाबाद

इतर बातम्या
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
सोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
आटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
कामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर  : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...