पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी रोपवाटिकांची कामे सुरू

यंदा पाच ते सहा एकरांवर भात लागवडीचे नियोजन आहे. पुढील आठवड्यात भाताची रोपवाटिका तयार करणार आहे. सध्या भात खाचराच्या मशागतीची कामे सुरू आहेत. - दादा पवार, शेतकरी, खोपी, ता. भोर, जि. पुणे.
भात लागवडीसाठी गादी वाफे तयार करणे सुरु
भात लागवडीसाठी गादी वाफे तयार करणे सुरु

पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. भात उत्पादकांनी रोपवाटिका टाकण्यास सुरवात केली असून, त्यासाठी बियाण्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. यंदा भातपीक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज दिल्यामुळे शेतकऱ्यांनी मे महिन्यापासूनच खरिपाची तयारी सुरू आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, आंबेगाव, जुन्नर या भात पट्ट्यांतील शेतकऱ्यांनी सध्या मशागतीची कामे हाती घेतली आहे.

काही शेतकऱ्यांनी भात बियाण्यांची उगवणक्षमता तपासून घेण्यास प्राधान्य दिले आहे. अनेक ठिकाणी रोपवाटिका तयार करण्याची कामे सुरू झाली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे, अशा शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका तयार करण्यास सुरवात केली आहे.

यंदा ‘आत्मा’अंतर्गत यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्यासाठी रोपवाटिका कशी तयार करावी याचे प्रात्यक्षिक शेतात करण्यात येणार आहेत.

मावळ तालुक्‍यातील फळणे येथील शेतकरी बजाबा मालपोटे म्हणाले, की यंदा मी पाच ते सहा एकरांवर भात लागवड करणार आहे. सध्या शेताची नांगरणी सुरू आहे. मला यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करायची असल्याने त्यासाठी आवश्‍यक रोपवाटिकेची माहिती घेतली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत भात रोपवाटिका तयार करणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com