पालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारी

पालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारी
पालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारी

नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन दिवसांत पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांसोबत धरणावर जाऊन दरवाजे खुले करण्यात येतील आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यासाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिल्याने पालखेड कालवा प्रशासन नरमले असून, सोमवारी (ता. १९) आवर्तन सोडण्याची तयारी दर्शविली आहे.

पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर दिंडोरी, निफाड व येवला या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम केलेला आहे. शेतकऱ्यांनी प्रामुख्याने ठिबक सिंचनाचा वापर करून द्राक्ष, डाळिंब यांसह इतर रब्बीची पिके घेतलेली आहेत. येवला व निफाड तालुक्यांतील शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. कांदा हे नगदी पीक असल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांची अपरिमित हानी होत असून, उभी पिके जळू लागली आहेत. त्याचबरोबर येवला, निफाड तालुक्यांसह मनमाड येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना  पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरपासून आवर्तन द्यावे, अशी भुजबळांची मागणी होती. मात्र अजूनही कालवा सल्लागार समितीची बैठकच न घेतल्यामुळे आवर्तनाबाबत संभ्रम निर्माण झाला. शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण आहे.

भुजबळ यांनी इशारा देताच यंत्रणा हलली असून, सोमवारपासून पालखेड कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पालखेड पाटबंधारे विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

 पत्रकानुसार, पालखेड धरण समूहातील सिंचन व बिगरसिंचन आवर्तन सोमवारपासून सोडण्यात येत आहे. याची लाभक्षेत्रातील शेतकरी बिगर सिंचन संस्था यांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आवर्तनादरम्यान अनधिकृत पाणी उपसा करणे, डोंगळ्याद्वारे पाणी उपसा करणे तसेच कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या कामकाजात अडथळे निर्माण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आदी कृत्य केल्यास पाटबंधारे अधिनियमानव्ये गुन्हे दाखल करण्यात येतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com