agriculture news in marathi, Preparations to release the rotation from Palkheedam today | Agrowon

पालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन दिवसांत पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांसोबत धरणावर जाऊन दरवाजे खुले करण्यात येतील आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यासाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिल्याने पालखेड कालवा प्रशासन नरमले असून, सोमवारी (ता. १९) आवर्तन सोडण्याची तयारी दर्शविली आहे.

नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन दिवसांत पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांसोबत धरणावर जाऊन दरवाजे खुले करण्यात येतील आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यासाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिल्याने पालखेड कालवा प्रशासन नरमले असून, सोमवारी (ता. १९) आवर्तन सोडण्याची तयारी दर्शविली आहे.

पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर दिंडोरी, निफाड व येवला या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम केलेला आहे. शेतकऱ्यांनी प्रामुख्याने ठिबक सिंचनाचा वापर करून द्राक्ष, डाळिंब यांसह इतर रब्बीची पिके घेतलेली आहेत. येवला व निफाड तालुक्यांतील शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे.
कांदा हे नगदी पीक असल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांची अपरिमित हानी होत असून, उभी पिके जळू लागली आहेत. त्याचबरोबर येवला, निफाड तालुक्यांसह मनमाड येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना  पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरपासून आवर्तन द्यावे, अशी भुजबळांची मागणी होती. मात्र अजूनही कालवा सल्लागार समितीची बैठकच न घेतल्यामुळे आवर्तनाबाबत संभ्रम निर्माण झाला. शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण आहे.

भुजबळ यांनी इशारा देताच यंत्रणा हलली असून, सोमवारपासून पालखेड कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पालखेड पाटबंधारे विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

 पत्रकानुसार, पालखेड धरण समूहातील सिंचन व बिगरसिंचन आवर्तन सोमवारपासून सोडण्यात येत आहे. याची लाभक्षेत्रातील शेतकरी बिगर सिंचन संस्था यांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आवर्तनादरम्यान अनधिकृत पाणी उपसा करणे, डोंगळ्याद्वारे पाणी उपसा करणे तसेच कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या कामकाजात अडथळे निर्माण करणे, सरकारी कामात अडथळा
आणणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आदी कृत्य केल्यास पाटबंधारे अधिनियमानव्ये गुन्हे दाखल करण्यात येतील.

इतर बातम्या
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
पाण्याअभावी फळबागांवर संकटअकोला : फळबागांसाठी अोळख असलेल्या अकोट तालुक्यात...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
तूर हमीभाव नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठसांगली : खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी ऑनलाइन...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...