agriculture news in marathi, Prepare the plan for rehabilitation of Sanctuaries | Agrowon

अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

राधानगरी, जि. कोल्हापूर ः ‘अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेज रकमेत वाढ करण्याच्या मागणीचा प्रभावी पाठपुरावा करू, पुनर्वसन कार्यवाही कालबद्ध कृतिआराखडा तयार करून, वेळीच करावी. आता आणखी उशीर लावू नये,’ असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.

राधानगरी, जि. कोल्हापूर ः ‘अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेज रकमेत वाढ करण्याच्या मागणीचा प्रभावी पाठपुरावा करू, पुनर्वसन कार्यवाही कालबद्ध कृतिआराखडा तयार करून, वेळीच करावी. आता आणखी उशीर लावू नये,’ असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.

विस्तारित राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील समाविष्ट खेड्यांतील कुटुंबांच्या पुनर्वसन कार्यवाहीबाबतची आढावा बैठक वन्यजीव कार्यालयात झाली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार कार्यवाहीच्या आढाव्यासाठी पुन्हा दोन ऑक्‍टोबरला बैठक घेण्याचा निर्णय झाला. बैठकीला राधानगरीच्या प्रांताधिकारी मनीषा कुंभार, तहसीलदार शिल्पा ओसवाल, उपविभागीय अधिकारी (वन्यजीव) विजय खेडकर, प्रभारी सहायक उपवन संरक्षक प्रशांत तेंडुलकर, अभयारण्यग्रस्त गावांचे सरपंच उपस्थित होते.

आमदार आबिटकर म्हणाले, ‘स्वेच्छा पुनर्वसन योजनेतील जाचक अटी व नियम शिथिल होण्यासाठी लवकरच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत वन्यजीव व महसूल अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन होईल. पुनर्वसन पॅकेजची रक्कम संबंधित कुटुंबाला विनाविलंब अदा करण्यात यावी. वन्यजीव व महसूल यंत्रणेने समन्वयाने काम केले, तरच पुनर्वसन प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल.’

बैठकीत अभयारण्यग्रस्तांनी पुनर्वसन कार्यवाहीतील त्रुटी रखडत सुरू राहिलेली कार्यवाही, दुसऱ्या टप्प्यातील पॅकेज रक्कम मिळण्याची किचकट व गुंतागुंतीची प्रक्रिया याकडे लक्ष वेधले. काहींनी भावनिक होऊन व्यथा मांडल्या. स्वेच्छा पुनर्वसन योजनेबाबत अभयारण्यग्रस्त कुटुंबांत परस्परविरोधी भूमिका बैठकीतील चर्चेतून समोर आल्या.

स्वेच्छा पुनर्वसन पॅकेजसाठी आठ कोटी निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. ज्या खेड्यांतील सर्व कुटुंबे स्वेच्छा पुनर्वसनासाठी मागणी संमती देतील, त्या खेड्यांचे येथून पुढे प्राधान्याने पुनर्वसन केले जाईल. अभयारण्यग्रस्तांच्या स्वमालकीच्या जमिनी, झाडे, यांचे फेरमूल्यांकन करून, त्यातील त्रुटी दूर केल्या जातील. निश्‍चित वेळेत पुनर्वसन होईल यावर भर दिला जाईल.
- प्रभुनाथ शुक्‍ल, उपवनसंरक्षक

इतर बातम्या
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...