धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची तयारी

धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची तयारी
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची तयारी

धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची तयारी सुरू झाली असून, शेतकरी ठिबक अंथरणी, बियाणे खरेदीच्या लगबगीत आहेत.  जिल्ह्यात धुळे तालुक्‍यातील नेर, कुसुंबे, कापडणे, न्याहळोद, जापी, शिंदखेडामधील पढावद, टाकरखेडा, शिरपुरातील होळनांथे, जापोरा, तरडी, भाटपुरा, थाळनेर, अर्थे, कुवे, तऱ्हाडी आदी भागांत कापूस लागवड या आठवड्यात सुरू होईल, असे संकेत आहेत. कापूस लागवडीसाठी शेतकरी ठिबक संच बसविण्याचे काम सध्या करीत आहेत. सबमेन पाइप बसविणे, नळ्या अंथरणे आदी कामे सुरू आहेत. त्यासाठी मजुरांची मदत घेतली जात असून, कडक उन्हात शेतकऱ्यांना ही कामे उरकून घ्यावी लागत आहेत. जिल्ह्यातही कापूस बियाणे दाखल झाले आहे. त्याचे वितरण या आठवड्यात सुरू होईल. शेतकऱ्यांचा कल देशी कापूस बियाण्याकडे अधिक आहे. ठिबकचे दर स्थिर आहेत. परंतु करवाढीने अधिक दरातील ठिबक शेतकऱ्यांना घ्यावी लागत आहे. नॉन आयएसआय ठिबकला शेतकरी प्राधान्य देत आहेत. 

भरारी पथकांची नजर  जिल्ह्यात बियाणे दाखल झाले आहे. परंतु गुजरात, मध्य प्रदेशातील कापूस बियाणेही जिल्ह्यात दाखल झाल्याची कुरबूर आहे. भरारी पथके सर्व चार तालुक्‍यांमध्ये कार्यरत असून, अनधिकृत बियाणे विक्रीसंबंधी कृषी विभाग लक्ष ठेऊन असल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यात अजून अनधिकृत किंवा बोगस बियाणे पकडण्याची कारवाई कुठेही झालेली नाही, अशी माहिती मिळाली.  आमच्या भागात पुढील आठवड्यात पूर्वहंगामी कापूस लागवड काही शेतकरी करतील. कारण, पुरेसे पाणी सर्वांकडे नाही; परंतु शिरपूर भागात लागवड अधिक वेगात होते. बियाणे पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याची स्थिती आहे. काळाबाजारही काही भागात सुरू आहे. - शरद पवार, शेतकरी, पढावद (जि. धुळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com