अकोला, बुलडाणा जिल्ह्यांच्या पैसेवारीबद्दल नाराजी

सोयाबीनचे उत्पादन ३० टक्केही नसताना एवढी पैसेवारी कशी निघाली हा प्रश्न अाहे. या नजरअंदाज पैसेवारीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले अाहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मनमानी पद्धतीने काढलेल्या या पैसेवारीविरुद्ध अाम्ही अावाज उठवू. - लखन गाडेकर, किसान सेना जिल्हाप्रमुख, बुलडाणा
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांच्या पैसेवारीचा अहवाल सादर
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांच्या पैसेवारीचा अहवाल सादर

अकोला : सप्टेंबरअखेर नजरअंदाज पैसेवारीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असून, अकोला जिल्ह्यात ७३ पैसे, तर बुलडाण्यात ६१ पैसेवारी दर्शविण्यात अाली अाहे. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यात या मोसमात सरासरीच्या २५ टक्के पाऊस कमी पडलेला असून, खरीप हंगाम अडचणीत अालेला अाहे. उत्पादकता घटलेली असताना पैसेवारी ६१ दाखविण्यात अाल्याचा अारोप शेतकऱ्यांनी केला असून नाराजीचा सूर उमटू लागला अाहे. अकोला जिल्ह्यातही अकोट, तेल्हारा या तालुक्यांमध्ये समाधानकारक परिस्थती नाही.

महसूल विभागाने अकोला जिल्ह्याची ९९१ गावांची पैसेवारी ७३ एवढी दर्शवित विभागीय अायुक्तांकडे अहवाल दिला अाहे. यात अकोट तालुक्याची ७१, तेल्हाराची ७२, बाळापूर ७१, पातूर ७३, मुर्तिजापूर ७२, तर अकोला तालुक्यातील १८५ गावांची सर्वाधिक ७७ पैसेवारी काढण्यात अाली अाहे.

या मोसमात अकोला जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली अाहे. मात्र दोन ते तीन मोठे खंड पडले. तसेच अकोट, तेल्हारा या तालुक्यांमधील  या भागातील प्रकल्प भरले नाही. पावसातील खंडामुळे खरीपातील पिकांची उत्पादकता कमी येत अाहे. सोयाबीन एकरी तीन क्विंटलपासून सुरू होत अाहे.

बुलडाण्यात नाराजी या हंगामात वऱ्हाडातील बुलडाणा जिल्हा कमी पावसामुळे संकटात सापडलेला अाहे. पावसाळ्यातसुद्धा काही गावांना टँकरने पाणी पुरवावे लागले. खरीप पिकांची स्थितीही बिकट अाहे. मात्र यंत्रणांना सर्वत्र अालबेल दिसून अाले. परिणामी प्रशासनाने नजरअंदाज पैसेवारी ६१ पैसे  काढली आहे. यात बुलडाणा, चिखली, मेहकर, लोणार, मलकापूर या तालुक्यांची पैसेवारी ६३ ते ७० पैशांदरम्यान निघाली असल्याने सरासरी ६० च्या पुढे गेली. या तुलनेत देऊळगावराजाची ५६, सिंदखेडराजा ५७ , मोताळा ५८, नांदुरा ५६, खामगाव ५६, जळगाव जामोद ५५ या तालुक्यांची पैसेवारी अाली अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com