agriculture news in marathi, Presenting the survey report of 93 villages in Nashik | Agrowon

नाशिकमधील ९३ गावांचा पाहणी अहवाल सादर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी पर्जन्यमान झाल्यामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, शासनाने ठरविलेल्या निकषानुसार गेल्या चार दिवसांत आठ तालुक्यांतील ९३ गावांमध्ये पथकाने प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील पीक परिस्थितीची माहिती आॅनलाइन शासनाकडे सादर केली आहे. ही माहिती शासनाकडे रवाना झालेली असली तरी, तीन तालुक्यांची मंत्र्यांकडून पाहणीच झाली नसल्याने त्यासाठी जलसंधारण मंत्री राम शिंदे हे लवकरच भेट देणार असल्याचे सांगण्यात आले.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी पर्जन्यमान झाल्यामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, शासनाने ठरविलेल्या निकषानुसार गेल्या चार दिवसांत आठ तालुक्यांतील ९३ गावांमध्ये पथकाने प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील पीक परिस्थितीची माहिती आॅनलाइन शासनाकडे सादर केली आहे. ही माहिती शासनाकडे रवाना झालेली असली तरी, तीन तालुक्यांची मंत्र्यांकडून पाहणीच झाली नसल्याने त्यासाठी जलसंधारण मंत्री राम शिंदे हे लवकरच भेट देणार असल्याचे सांगण्यात आले.

नाशिक जिल्ह्यात यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाल्यामुळे व त्यातही तो सलग न पडल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली होती. आॅगस्टच्या अखेरीस काही तालुक्यांमध्ये पडलेल्या पावसाने खरिपाच्या काही पिकांना जीवदान मिळाले. परंतु अन्य तालुक्यांमध्ये पाऊस न पडल्याने पिकांवर वाईट परिणाम झाला. आॅगस्टनंतर पावसाने दडीच मारल्याने यंदा आॅक्टोबरमध्येच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी होत असल्याने सरकारने त्याची दखल घेत सर्वच पालकमंत्र्यांना जिल्ह्यांच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार पर्जन्यमान, जमिनीची आर्द्रता, पीक परिस्थिती या तांत्रिक बाबी तपासण्याच्या सूचना कृषी, महसूल व भूजल विभागाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील चांदवड, नांदगाव, येवला, सिन्नर, मालेगाव, बागलाण, देवळा, नाशिक या आठ तालुक्यांची शासनाने निवड करून, त्यातील दहा टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतपिकांची माहिती व त्याचे छायाचित्रे घेऊन ती आॅनलाइन पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चांदवड, नांदगाव, मालेगाव, बागलाण व देवळा या पाच तालुक्यांचा दौरा केला. उर्वरित तीन तालुक्यांची पाहणी जलसंधारणमंत्री राम शिंदे करणार आहेत.

जिल्ह्यात ५७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा
सिन्नर तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने आणखी चार टॅँकर नव्याने मंजूर करण्यात आले असून, एकट्या सिन्नर तालुक्यात १७, तर जिल्ह्यात ५७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. साधारणत: २५० गावे, वाड्यांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

इतर बातम्या
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
परभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतकपरभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
पेरणीच्या अनुदानासाठी संभाजी ब्रिगेडचा...हिंगोली :  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
सहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...
मराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...
पणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे  ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...
करंजवण ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेला...नाशिक : मनमाड शहरासाठी बहुचर्चित व बहुप्रतिक्षित...
पुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...
पुणे : कृषी अवजारे, साहित्य खरेदीसाठी...पुणे  : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून...
खानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव  ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...
शकूबाईंच्या लढ्याला आले यश;  वनजमीन...वणी, जि. नाशिक  : शेतकरी व आदिवासींच्या...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद  ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...