जळगाव जिल्हा परिषदेत अध्यक्षा एकाकी

जळगाव जिल्हा परिषदेत अध्यक्षा एकाकी
जळगाव जिल्हा परिषदेत अध्यक्षा एकाकी

जळगाव : जिल्हा परिषदेत प्रशासन सदस्य, पदाधिकाऱ्यांच्या कामांत खोडा घालत असल्याच्या तक्रारी पुन्हा येत आहेत. खुद्द अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांनी काही अधिकारी आपल्याविरोधात काम करतात. किरकोळ माहितीदेखील देत नाहीत. प्रशासनाविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. 

अध्यक्ष पाटील यांनी प्रशासनाकडून आपली कशी अडवणूक केली जाते, या संदर्भात जाहीरपणे प्रतिक्रिया दिल्या, परंतु त्यांच्या समर्थनार्थ जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे अध्यक्ष एकाकी पडल्याचे चित्र आहे. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हापासून विविध योजनांवरील कामांचे १८ कोटींची देणी फेडली, परंतु यासंबंधी माहिती मागितल्यास अधिकारी ती देत नाहीत. अधिकारी नियतव्यव्यतिरिक्त कामे घेत नाहीत. आमच्या काही कामांबाबत बोट ठेवतात, नियम सांगितले जातात, अशी तक्रार अध्यक्ष पाटील यांनी केली.

मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर राजीनामा देऊ, अशी टोकाची भूमिका अध्यक्षांनी जाहीर केली आहे. अशातच काही सदस्यांनी पदाधिकारी आपला निधी कमी करून आपल्या मर्जीची कामे उरकून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. अतिरिक्त कामे मंजूर करू नयेत. कारण या कामांमुळे इतर सदस्यांना कमी निधी मिळेल. त्यांनाही उत्तरदायित्व असून, ग्रामीण भागात त्यांना कामांबाबत ग्रामस्थ विचारतात. एकही काम केले नाही, अशा टिकेला सदस्यांना तोंड देण्याची वेळ प्रशासनाने आणू नये, अशा तक्रारी आहेत. यामुळे पदाधिकाऱ्यांची काही कामे, प्रस्ताव पुढे सरकविणे टाळले आहे. रखडलेल्या निविदा प्रक्रिया मार्गी लावण्याबाबतही प्रशासन सध्या पुढाकार घेत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com