Agriculture news in marathi, The President does not have the right to work | Agrowon

कामवाटपांचे अधिकार अध्यक्षांना नको
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 जुलै 2018

यंदा सर्वांना कामांचे समान वाटप व्हायला हवे. गेल्या वर्षी सभापतींनी सेस फंड आपापसात वाटून घेतले होते. त्यामुळे कोणालाही अधिकार न देता कामांचे समान वाटप व्हावे, अशी मागणी सर्वसाधारण सभेत करणार आहोत.
- पल्लवी सावकारे, सदस्य, (भाजप) जिल्हा परिषद

काम वाटपासंदर्भात ५० लाखांवरील अधिकार सभेला आहेत. कामांच्या याद्या सभेत ठेवून पारदर्शकता दर्शवावी. गेल्या वर्षी काम वाटपासंदर्भात सर्वांचीच नाराजी होती. यामुळे अध्यक्षांना या वर्षी अधिकार देण्याचा प्रश्‍न उरत नाही.
- नानाभाऊ महाजन, सदस्य, (शिवसेना) जिल्हा परिषद

जळगाव : जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसंदर्भातील कामांचे नियोजन करण्यासंदर्भातील सर्व अधिकार अध्यक्षांना देण्यास विरोधकांसह सत्ताधारी गटातील सदस्यदेखील इच्छुक नसल्याचे चित्र आहे. याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नसले, तरी २५ जुलैला होणाऱ्या विशेष सभेत याबाबतचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. या सभेबाबत मंगळवारी (ता. १७) जिल्हा परिषदेत प्रशासन व पदाधिकारी यांना आढावा घेतला.

जिल्हा परिषदेच्या विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांसाठी निधी प्राप्त होत असतो. शिवाय, स्वनिधीतूनही तरतूद केली जाते. मागील वर्षी निधी खर्च करण्यासाठी कामांचे नियोजन नऊ महिने उशिराने झाले होते. त्यामुळे कामवाटप लवकर होण्याच्या दृष्टीने विशेष सभा घेऊन सर्व अधिकार अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना देण्यात आले होते. त्यानंतर कमी कामे मिळाल्यामुळे विरोधकांबरोबरच सत्ताधारी गटातील सदस्य नाराज होते. यंदा कामवाटप करण्यासंदर्भातील अधिकार अध्यक्षांना न देण्याबाबतच्या हालचाली सुरू आहेत.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गेल्या महिन्यात झाली. परंतु आचारसंहिता असल्याने कोणतेही महत्त्वाचे निर्णय किंवा कामांना मंजुरी देण्यात आलेली नव्हती. यामुळे आता विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. ती २५ जुलैला छत्रपती शाहू महाराज सभागृहात होणार आहे.

 

इतर बातम्या
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
शेतीपिकांना मोजूनच पाणी दिले पाहिजे ः...पुणे ः पाणी ही संपत्ती आहे; पण ती मोजली जात नाही...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
पाणीटंचाईच्या कामांनाही आचारसंहितेची झळभंडारा ः उन्हाच्या झळांसोबतच पाणीटंचाईचे संकटही...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणारनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा...
शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वीपुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’...
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधारअमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून...परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या...
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढलीमुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा...मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी...
चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने...चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर...