agriculture news in Marathi, President Ramneth Kovind says government will work on doubling farmers income, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नवाढीसाठी सरकार प्रयत्नशील
वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

देशातील शेतकऱ्यांचे व शेतीसमोरील प्रश्नांचे निराकरण करणे आणि शेतकऱ्यांना विकासाच्या संधी देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे ही सरकारची प्राथमिकता आहे. भाजप सरकारच्या योजना या केवळ शेतकऱ्यांना शेतीत जाणवणाऱ्या अडचणी दूर करतेच; शिवाय शेतकऱ्यांचा शेतीवरील खर्च कमी करण्यास मदत करत आहे.
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी अनेक निर्णय घेतले असून, विकास हेच उद्दिष्ट आहे. सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे साध्य करण्यासाठी केंद्र सरकार काम करेल, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला. 

संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सोमवारपासून (ता. २९) सुरवात झाली. सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अधिवेशन सुरू झाले. आपल्या भाषणात त्यांनी सरकारच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. तसेच सरकारच्या भविष्यातील उद्दिष्टांविषयीही माहिती दिली.

या वेळी राष्ट्रपती म्हणाले, की केंद्र सरकारचे एकमेव उद्दिष्ट हे समाजाचे सशक्तीकरण करणे हेच असून, विकास हा प्रत्येक नागरिकापर्यंत पोचला पाहिजे. २०२२ पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे लक्ष्य अाहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या आॅनलाइन जोडल्या आहेत.

या योजनेला ई-नाम असे संबोधले जात असून, आतापर्यंत ३६ हजार कोटींच्या शेतमालाच्या उलाढाली ई-नामच्या माध्यमातून आॅनलाइन झाल्या आहेत. सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामाचे फलित म्हणजेच २७५ दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन झाले आणि जवळपास ३०० दशलक्ष टन फलोत्पादन झाले आहे. त्यामुळे देश अन्नधान्य आणि फलोत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. 

राष्ट्रपती म्हणाले...

  •  शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यावर सरकार काम करणार.
  •  शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी बाजार समित्या आॅनलाइन जोडल्या.
  •  ई-नामच्या माध्यमातून आतापर्यंत ३६ हजार कोटींची उलाढाल.
  •  सरकारच्या योजनांमुळेच अन्नधान्य २७५ दशलक्ष टन, तर फलोत्पादन ३०० दशलक्ष टनांच्या पुढे
  •  आधारच्या माध्यमातून योजना गरिबांपर्यंत पोचत आहेत. 
  •  विकासाचे फळ हे समाजातील प्रत्येक घटकाला मिळायला हवे.

अधिवेशन दोन दिवसांसाठी तहकूब
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सोमवारी (ता. २९) सुरवात झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला आणि दोन्ही सभागृहे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दोन दिवासांसाठी तहकूब करण्यात आल्याचे लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी घोषित केले. १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात ९ फेब्रुवारीपर्यंत कामकाज होईल. त्यानंतर कामकाज थांबेल व पुन्हा ५ मार्च ते ६ एप्रिल यादरम्यान संसदेचे अधिवेशन होणार आहे.

 

इतर बातम्या
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
सोसायटीचा डाळिंबाचा विमा अडकलाआटपाडी, जि. सांगली ः मृग बहारात धरलेल्या डाळिंब...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
गडकरींनी घेतले ‘सरांचे’ आशीर्वादनागपूर ः मेळाव्याच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
कमी उत्पादन आलेल्या मंडळांमध्ये विमा...परभणी ः खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये प्रतिहेक्टरी...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...