दीक्षाभूमी त्याग, शांतता, मानवतेची प्रतीक ः राष्ट्रपती
विनोद इंगोले
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

योगाप्रमाणेच विपश्‍यनेलादेखील कोणत्याच धर्मासोबत जोडू नये. हे दोन्ही मानवी कल्याणासाठी अाहेत.
-रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

नागपूर ः नागपुरातील दीक्षाभूमी त्याग, शांतता व मानवतेची प्रतीक असल्याची भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली. राष्ट्रपती कोविंद यांचे शुक्रवारी (ता. २२) सकाळी नागपुरात आगमन झाले. त्यांचा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. त्यांनी विमानतळावरून थेट दीक्षाभूमीवर येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर नंदा जिचकार अादी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर संदेश पुस्तिकेत राष्ट्रपतींनी आपल्या भावना शब्दबद्ध केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या पवित्र भूमीत समाजक्रांतीचा पाया रचला. त्यांनी येथूनच संपूर्ण समाजाला प्रगतीकडे नेण्याचा संकल्प केला. ही दीक्षाभूमी त्यामुळेच त्याग, शांतता व मानवतेची प्रेरणा ठरल्याचे त्यांनी संदेश पुस्तिकेत लिहिले.

दीक्षाभूमीवर राष्ट्रपतींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांनी स्वागत केले. तसेच स्मारक समितीतर्फे त्यांना चांदीचे सन्मानचिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर रामटेक येथील जैन मंदिरात जात त्यांनी दर्शन घेतले. तेथून कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात बांधण्यात आलेल्या विपश्‍यना ध्यान केंद्राचे उद्‍घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. असुरक्षित आणि धकाधकीच्या या वातावरणात गौतम बुद्धांचे अहिंसा, करुणा व प्रेमाचे विचारच मानवी जीवनात स्थिरता आणण्यास पूरक ठरतील, असे राष्ट्रपती म्हणाले. 

इतर ताज्या घडामोडी
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...