लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम घोटाळ्याची भीती : शरद पवार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो. लोकांना बदल हवा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला विजयाची खात्री आहे. पण ‘ईव्हीएम’मध्ये फेरफार केले जाण्याची भीती आम्हाला वाटते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असतानाच ईव्हीएमबाबत देशभरातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा शंका उपस्थित केली आहे. मुंबईत विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी (ता. २३) संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत चंद्राबाबू नायडू, सुशीलकुमार शिंदे, प्रफुल्ल पटेल आदींसह आप, तृणमूल काँग्रेस, डीएमके, सीपीएम, सीपीआय आदी पक्षांचे नेते उपस्थित होते. 

प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय या दोन्ही यंत्रणांचा सरकारकडून वापर केला जात आहे. रिझर्व्ह बँकेतही हस्तक्षेप सुरू असून प्रत्येक सरकारी यंत्रणेत अशीच परिस्थिती आहे. प्राप्तिकर विभागाद्वारे भाजपविरोधकांच्या घरावर छापे टाकले जात आहे. आम्हाला ‘ईव्हीएम’बाबतही शंका येते. गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर शंका घेण्यास वाव आहे. त्यामुळे याचा परिणाम मतांवरही दिसू शकतो, असे चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.

‘ईव्हीएम’मध्ये फेरफार शक्य आहे. १९१ पैकी फक्त १८ देशांमध्येच निवडणूक प्रक्रियेत मतदानासाठी ‘ईव्हीएम’चा वापर केला जातो. विशेषत: छोट्या देशांमध्येच याचा वापर केला जातो. यापूर्वी अशाही काही घटना समोर आल्या आहेत ज्यात कोणतेही बटण दाबले तरी कमळालाच मत जात होते, असा दावा नायडूंनी केला. तर शरद पवार यांनीही ‘ईव्हीएम’बाबत शंका उपस्थित केल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com