Agriculture news in marathi; Pressure on red onion prices in Jalgaon | Agrowon

जळगावात लाल कांद्याच्या दरांवर पुन्हा दबाव
टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 जून 2019

जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. ३) लाल कांद्याची सुमारे १५०० क्विंटल आवक झाली. किमान ३०० व कमाल ७०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. दरात दोन दिवसांत क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची घट झाली असून, पूर्वमोसमी पावसाचे संकेत लक्षात घेऊन आवक वाढल्याने व्यापारी व अडतदार यांनी मिलीभगत करून हे दर पाडल्याचा दावा शेतकरी करीत आहेत. 

जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. ३) लाल कांद्याची सुमारे १५०० क्विंटल आवक झाली. किमान ३०० व कमाल ७०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. दरात दोन दिवसांत क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची घट झाली असून, पूर्वमोसमी पावसाचे संकेत लक्षात घेऊन आवक वाढल्याने व्यापारी व अडतदार यांनी मिलीभगत करून हे दर पाडल्याचा दावा शेतकरी करीत आहेत. 

जळगाव, अडावद (ता. चोपडा), चाळीसगाव येथील बाजारात लाल कांद्याच्या दरात घट झाली आहे. जूनमध्ये शेतकऱ्यांना पैशांची आवश्‍यकता असते, पाऊस आला तर शेतात साठविलेल्या कांद्याचे नुकसान होईल, या भीतीने सोमवारी लाल कांदा अनेक शेतकऱ्यांनी आणला. परिणामी आवक वाढली. बाजारातील चित्र लक्षात घेऊन अडतदार व व्यापारी यांनी दर पाडले.

शुक्रवारी (ता. ३१ मे) कांद्याचे दर १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. किमान दर ४५० रुपयांपर्यंत होते. सोमवारी मात्र दर्जेदार कांद्यासही ७०० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. आवक जळगाव, पाचोरा, भुसावळ, धुळे या भागातून होत आहे. कांद्याची काढणी जिल्ह्यात आटोपली आहे. लागवड कमी झाली होती. आवक मागील हंगामाच्या तुलनेत अधिक असतानादेखील दर हवे तसे नाहीत. किमान दर १२५० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळावेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

जळगाव, धुळे बाजार समितीमधील खरेदीदारांना समज द्या
लाल कांद्याचे दर धुळ्यासह जळगाव बाजार समितीत कमी आहेत. आवक कमी असताना दर्जेदार कांद्याचे दर कमी कसे? मागील वर्षी कमाल दर २५ ते २८ रुपये प्रतिकिलोपर्यंत बाजार समितीत मिळाले होते. मागील हंगामात मे अखेरीस आवक २४०० ते २५०० क्विंटलपर्यंत होती. या हंगामात आवक कमी, कांद्याचा दर्जा चांगला असताना दर कमी का? यासंदर्भात जळगाव व धुळे येथील बाजार समितीमधील खरेदीदार व अडतदार यांची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

इतर बाजारभाव बातम्या
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
नाशिकमध्ये आले प्रतिक्विंटल ८७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची ३८०० ते ४०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मंचरला कांद्याच्या भावात घसरणमंचर, जि. पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर...
रत्नागिरीत टॉमेटो प्रतिक्विंटल ३००० ते...रत्नागिरी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५२५ रुपये...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक आणि दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
अमरावती बाजारात भुईमूग शेंगांचे दर आणि...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत नव्या भुईमूग...
सोलापुरात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
टोमॅटो, हिरवी मिरचीची आवक कमी; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत गवार १५०० ते ५००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ३०० ते १७००...औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ३०० ते १४०० रुपये...
चोपडा, अमळनेर बाजार समित्यांमध्ये...जळगाव ः देशी व काबुली प्रकारच्या हरभऱ्याचे दर...
जळगावात लाल कांद्याच्या दरांवर पुन्हा...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अमरावतीत भुईमूग प्रतिक्‍विंटल ५२००...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत हंगामातील नव्या...