agriculture news in Marathi, Pressure on wheat prices, increase maize rates | Agrowon

गहू दरांवर दबाव, मका दरात वाढ शक्‍य
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 एप्रिल 2019

जळगाव ः खानदेशातील मोजक्‍याच बाजार समित्यांमध्ये सध्या बाजरीची आवक होत असून, दर २४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत स्थिर आहेत. शिरपूर व दोंडाईचा (जि. धुळे), चोपडा व अमळनेर येथील बाजारात सुरवातीला मळणी झालेल्या बाजरीची आवक सुरू असून, या बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन १५० क्विंटलदेखील मिळून आवक होत नसल्याची स्थिती आहे. 

जळगाव ः खानदेशातील मोजक्‍याच बाजार समित्यांमध्ये सध्या बाजरीची आवक होत असून, दर २४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत स्थिर आहेत. शिरपूर व दोंडाईचा (जि. धुळे), चोपडा व अमळनेर येथील बाजारात सुरवातीला मळणी झालेल्या बाजरीची आवक सुरू असून, या बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन १५० क्विंटलदेखील मिळून आवक होत नसल्याची स्थिती आहे. 

पेरणी खानदेशात सुमारे १५ हजार हेक्‍टरवर झाली होती. डिसेंबरमध्ये पेरणी केलेल्या बाजरीची मळणी शिरपूर, चोपडा भागात सुरू आहे. या भागातील शेतकऱ्यांनी लागलीच बाजारात विक्री करण्यास पसंती दिली असून, त्यांना सुरवातीच्या दरांचा लाभ काहीसा मिळाला आहे. किमान २००० व कमाल २४०० रुपये प्रतिक्विंटलचे दर दर्जेदार बाजरीला आहेत. शिरपूर येथील बाजारात आठवड्यातून तीन दिवस बऱ्यापैकी आवक होते. नंतरचे चार दिवस फारशी आवक नसते. शिरपूर व दोंडाईचा येथे प्रतिदिन सरासरी ८० क्विंटलपर्यंतची आवक होत आहे. धुळे व साक्री (जि. धुळे) येथील बाजारातही नगण्य आवक होत आहे. 

सध्या जळगाव, मुक्ताईनगर, पाचोरा येथील बाजारात आवक नसल्याचीच स्थिती आहे. जळगाव व चाळीसगाव येथील बाजारात पुढे आवक सुरू होईल. आवक कमी व उठाव बऱ्यापैकी असल्याने दर टिकून राहतील, असे सांगितले जात आहे.

मका दरात आणखी सुधारणा शक्‍य
मक्‍याची आवकही बाजरीप्रमाणेच नगण्य आहे. चोपडा, रावेर व मुक्ताईनगर भागात मळणी सुरू झाली आहे. परंतु या हंगामात अमेरिकन लष्करी अळीमुळे मका लागवड ३० टक्केच झाल्याने आवकेवर मोठा परिणाम दिसत असून, दर मागील तीन-चार महिन्यांपासून २१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. मक्‍याची खेडा खरेदी लवकरच चोपडा, रावेर व जळगाव भागात सुरू होईल. थेट शेतात प्रतिक्विंटल किमान २००० रुपये दर शेतकऱ्यांना या हंगामात मिळेल, अशी स्थिती आहे. मक्‍यासाठी प्रसिद्ध असलेल्या चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, अमळनेर येथील बाजारात सध्या मक्‍याची नगण्य किंवा किरकोळ आवक होत आहे. दरात पुढे आणखी किंचित सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. गव्हाची जळगाव, चोपडा व अमळनेरातील बाजारात आवक वाढत आहे. जळगाव बाजारात प्रतिदिन १२५ क्विंटल सरासरी लोकवन प्रकारच्या गव्हाची आवक झाली. वनफोरसेव्हन प्रकारच्या गव्हाचीदेखील किरकोळ आवक झाली. लोकवन गव्हास प्रतिक्विंटल किमान १८०० व कमाल २१५० रुपये प्रतिक्विंटलचे दर मागील आठवड्यात मिळाले. पुढे आवक कमी होऊ शकते, असे सांगण्यात आले.

इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
पुण्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर...पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते ३०००...साताऱ्यात १५०० ते २००० रुपये सातारा येथील...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ७०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३...
सोलापुरात कांदा दरात किंचित सुधारणासोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत श्रावण घेवडा,...पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राजस्थान, मध्य प्रदेशातून गव्हाच्या...जळगाव : बाजार समितीमधील किरकोळ व घाऊक विक्रेते,...
परभणीत काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात लिंबू प्रतिक्विंटल ८०० ते ६०००...जळगावात २४०० ते ४००० रुपये  जळगाव : कृषी...
कोल्हापुरात टोमॅटोला प्रति दहा किलोस ५०...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापुरात मेथी, शेपूला उठाव, दरात...सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळीच्या दरात ६० रुपयांनी...जळगाव  ः खानदेशात केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मानवत बाजार समितीत उद्यापासून हळद खरेदीमानवत, जि. परभणी ः मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार...
अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याला मागणीपुणे ः मंगळवारी (ता. ७) साजऱ्या होणाऱ्या अक्षय...
औरंगाबादेत आंबा ४ हजार ते १० हजार रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवग्याला प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ५०० ते १९००...अकोल्यात प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये अकोला ः...