जळगाव जिल्ह्यातील दुधाला पूर्वीचाच दर

``दूध उत्पादन परवडत नसतानाही शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करायला उशीर कसा केला, असा मुद्दा दूध उत्पादकांनी उपस्थित केला आहे.शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करायची जबाबदारी संघ, सोसायट्यांची आहे. दूध उत्पादकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. अजूनही गायीच्या दुधाला २१ रुपये प्रतिलिटरचे दर मिळत आहेत.`` - अतुल मधुकर पाटील, शेतकरी, केऱ्हाळे (जि. जळगाव) ``गायीच्या दुधाला २५ रुपये प्रतिलिटरचे दर देण्याबाबतचे आदेश मगील महिन्यात आले. त्याची अंमलबजावणी आम्ही उद्यापासून (ता. १ ऑगस्ट) करणार आहोत. त्यामुळे संघावर महिन्याला दोन कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.`` - मनोज लिमये, कार्यकारी संचालक, जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., जळगाव
जिल्ह्यातील दुधाला पूर्वीचाच दर
जिल्ह्यातील दुधाला पूर्वीचाच दर

जळगाव : गायीच्या दुधाला २५ रुपये प्रतिलिटरचे दर देण्यासंबंधीचे शासनाचे नवे आदेश जिल्हा सहकारी दूध संघांपर्यंत पोचून महिना उलटला तरी त्याची अंमलबजावणी अजूनही सुरू झालेली नाही. आजअखेर (ता. ३१) दुधाला जुनेच दर सोसायट्या व संघ देत आहेत. तर शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी बुधवारपासून (ता. १ ऑगस्ट) केली जाणार असल्याची माहिती जिल्हा सहकारी दूध संघाने दिली आहे.

 जिल्हा सहकारी दूध संघ सध्या एक लाख ८० हजार लिटर गायीच्या दुधाचे संकलन करीत आहे. सध्या ३.५ फॅटच्या गायीच्या दुधाला २१ रुपये प्रतिलिटरचा दर संघ देत आहे. ३.५ पेक्षा कमी फॅटच्या दुधाला २०.७० रुपये प्रतिलिटरचे दर मिळत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. यानंतर गायीच्या दुधाला २५ रुपये प्रतिलिटरचे दर देण्याचे आदेश शासनाने दिले. या आदेशांची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून करायची आहे. जिल्हा दूध संघात म्हशीच्या दुधाचे संकलन फक्त ५५ ते ६० हजार लिटर प्रतिदिन, असे आहे. तर, गायीचे दूध अतिरिक्त आहे, असा दावा संघ करीत आहे. २५ रुपये प्रतिलिटर या दरात दूध खरेदीची सुरवात झाल्यानंतर प्रतिमहिना दोन कोटी रुपयांचा भार दूध संघाला पेलावा लागणार आहे, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com