agriculture news in marathi, price of cattle become decrease, sangli, maharashtra | Agrowon

मिरज बाजारात जनावरांचे दर घटले
अभिजित डाके
रविवार, 31 मार्च 2019

चारा नाही, पाणी नाही. वैरण विकत देखील मिळत नाही. जनावरं जगवायची कशी, असा प्रश्न आहे. दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे मिरज येथील जनावरे बाजारात गाई विकायला घेऊन आलोय. पूर्वी दूधाळ गाईची किंमत ६० ते ७० हजार होती आता ३० ते ४० हजार रुपयांना पण कोणी घेत नाही. 
- मारुती आण्णा जाधव, कवठेमहंकाळ, जि. सांगली.
 

 सांगली ः चारा महागलाय, पाणी नाय, केवळ दुधाच्या पैश्यावर प्रपंच चालवणं कठीण झालाय. दोन पैक मिळत्याल म्हणून दावणीची जित्राबं इकायला घेऊन आलुया. बाजारात बी दर पडल्याती. दुभत्या जनावरांचा दर ६० हजार ते ७० हजार रुपयांवरुन ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत कमी झाल्याती; तरीबी कुणी जनावरं खरेदी करत नसल्याचे मिरज येथील बाजारात जनावरे विक्रीसाठी आलेले पशुपालक हताश होऊन सांगत होते.

मिरज येथे दर बुधवारी जनावरांचा बाजार भरला जातो. या बाजारात मंगळवारी रात्रीपासून जनावरांची आवक होते. हा बाजार पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सांगली जिल्ह्यासह, सोलापूर, कर्नाटक, कराड, शिरोळ, हातकणंगले भागातून येथे जनावरे विक्रीसाठी पशूपालक येतात. व्यापाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. खरेदी करण्यासाठी नेहमीच चढाओढ राहत असल्याने सातत्याने दर चढे राहतात. 

दुष्काळी भागातील जनावरांना चारा मिळत नसल्याने मिरज येथे बुधवारी (ता.२७) सकाळपासून गाई, म्हैशी विक्रीसाठी येत होत्या. जनावरे विक्रीसाठी पशुपालकांची धडपड सुरू होती. जनावरांचा दर चांगले मिळतील अशी त्यांना आशा होती. व्यापारी जनावरे खरेदीसाठी पुढे येत होते. केवळ दराची चौकशी करत होते. खरेदी केली तर चारा कुठून आणायचा, असा प्रश्न व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यामुळे जनावरांची खरेदी देखील कमी झाली असल्याचे चित्र बाजारात दिसत होते. 

पन्नास टक्क्यांनी आवक झाली कमी
सांगलीसह सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. चाऱ्याचीही अवस्था बिकट झाली आहे. जनावरे कशी जगवायची या विवंचनेत पशुपालक आहेत. वैरणीचा दर शेकडा चार ते पाच हजार रुपये आहे. तेही न परवडणारे आहेत. जनावरांना चारा उपलब्ध होत नसल्याने पशूपालक जनावरे विक्रीसाठी पुढाकार घेत आहेत. मात्र, जनावरे खरेदीसाठी कोणीच पुढे येत नसून खरेदी करण्यांची संख्यादेखील कमी झाली आहे. त्यामुळे जनावरांच्या बाजारात ५० टक्के आवक कमी झाली आहे.
--
म्हशींना मागणी; पण खरेदीसाठी उत्साह नाही
मिरज बाजारात गाई आणि म्हशींची आवक कमी झाली आहे. परंतु म्हैशींच्या दरात १० ते १५ हजार रुपयांनी वाढ झाली आहे.  म्हशींचे दर जरी वाढले असले तरी खरेदीसाठी पशूपालक पुढे येताना दिसत नाहीत. बहुतांश नदीकाठचे पशुपालक म्हशींची खरेदी करतात. परंतु दहा म्हशी मागे दोन ते तीन म्हशींची खरेदी होताना दिसते आहे.

गाईच्या दुधाचे दर फारच कमी आहेत. शासनाने गाईच्या दुधाला अनुदान जाहीर केले, पण ते अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे जनावरे सांभाळणे मुश्कील झाल्याने गाई विक्रीस घेऊन आलोय. मात्र इथं पण गाईला दर मिळत नाही. अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे,अशी माहिती तारदाळ, (जि. कोल्हापूर) येथील  निरगोंड तुकाराम जाधव यांनी सांगितले.

जानेवारीत असलेले गाईंचे दर

  • लहान    ८००० ते १५,०००
  • मोठी    १५,००० ते ७५,०००

सध्याचे गाईंचे दर

  • लहान    ३००० ते १०,०००
  • मोठी    १०,००० ते ४०,००० 

जानेवारीतील म्हशींचे दर 

  • रेडी     ६५०० ते १५,०००
  • म्हैस     ६५,००० ते ७०,००० 

सध्याचे म्हशींचे दर 

  • रेडी     ७५०० ते २०,०००
  • म्हैस     ७५,००० ते ९०,००० 

इतर अॅग्रोमनी
सुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...
सरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...
नेहे कुटुंबीयांनी कांदा पिकावर बसवले...नगर जिल्ह्यातील सावरगाव तळ (ता. संगमनेर) हे डोंगर...
गावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...
रब्बी हंगामातील आवकेचा दरावर परिणाम या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू,...
सुताचे दर वाढले जळगाव ः देशांतर्गत सूतगिरण्यांसमोर कापूस...
मका, हळद, कापसाचा तेजीकडे कलबाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या...
रुपयाचे अवमूल्यन, सरकीतील तेजीने कापूस...पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५००...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...
नियोजन, काटेकोर अंमलबजावणीतून साधला...शेतीतील वाढता खर्च ही शेतकऱ्यांसमोरची मुख्य...
हळद, मका, कापूस मागणीत वाढीचा कलएप्रिल महिन्यात हळदीची मागणी वाढत आहे. त्यामुळे...
पुढील हंगाम ७० लाख टन साखरेसह सुरू होणारकोल्हापूर : साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे...
कौशल्य विकासातून संपत्तीनिर्माणशेती-उद्योगात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण ...
मिरज बाजारात जनावरांचे दर घटले सांगली ः चारा महागलाय, पाणी नाय, केवळ...
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी लिंबाचा आधारउन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी असते. यंदाच्या...
कापूस, मक्याच्या मागणीत वाढ सध्या बाजारपेठेत मका, हळदीच्या मागणीत वाढ आहे....
कापसाच्या किमतीत आणखी सुधारणानिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या...