agriculture news in Marathi, price of orange reached 40 thousand rupees per tonn | Agrowon

अमरावतीत संत्रा पोचला प्रतिटन ४० हजारांवर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

फळगळीमुळे संत्री उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. ११०० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे संत्री उत्पादकांना हेक्‍टरी ५० हजार रुपयांची मदत दिली जावी, अशी मागणी आहे. 
- रमेश जिचकार, कार्यकारी संचालक, संत्री उत्पादक संघ

अमरावती ः तापमानात झालेली वाढ, अत्यल्प पाऊस, त्यासोबतच बुरशीजन्य रोग, यामुळे झालेली फळगळ; त्यामुळे बाजारात संत्री दरात चांगलीच तेजी आली आहे. ३५ ते ४० हजार रुपये प्रति टनाप्रमाणे संत्र्याचे व्यवहार होत असून, येत्या काळात पांढूर्णा, जरुड, हिवरखेड परिसरातील संत्र्याला ५० हजार रुपये प्रति टनाचे दर मिळतील, अशी शक्‍यता महाऑरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे यांनी व्यक्‍त केली. 

अमरावती जिल्ह्यात ८६ हजार हेक्‍टरच्या आसपास संत्री लागवड आहे. त्यातील सुमारे ५५ ते ६० हजार हेक्‍टर उत्पादनक्षम आहे. यातील ३० ते ३५ हजार हेक्‍टर क्षेत्रातून मृग तर २५ ते ३० हजार हेक्‍टरमध्ये आंबीया बहारातील फळांचे उत्पादन घेतले जाते.

पूर्वी मृग बहारातील संत्री घेण्यावरच ९० शेतकऱ्यांचा भर राहत होता. उन्हाळ्यात ही फळे बाजारात येत, त्यामुळे त्यामध्ये गोडवा अधिक राहत होता. परंतु नजीकच्या काळात मृग ६० टक्‍के तर आंबीया बहारातील फळे ४० टक्‍के शेतकरी घेतात. यावर्षी संत्री उत्पादकांना वातावरणातील बदलाचा मोठा फटका बसला. पावसातील खंड, त्यामुळे वाढलेले तापमान तसेच अल्टर्नेरिया व डिप्लोडिया या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन संत्र्याची फळगळ झाली.

बाजारात मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने दरात तेजी येत ३५ ते ४० हजार रुपये प्रति टनावर संत्र्याचे दर पोचले आहेत. गेल्या काही वर्षातील सर्वात उच्चांकी दर असल्याने संत्री उत्पादकांमध्येदेखील समाधान व्यक्‍त होत आहे. 

दर पोचतील ५० हजार प्रतिटनावर 
आंबीया बहारातील या संत्र्याचा कडकपणा डिसेंबरपर्यंत राहतो. त्यानंतर पांढूर्णा (मध्य प्रदेश),  हिवरखेड, जरुड भागातील संत्र्याला कडकपणा मिळतो. त्यामुळे १५ डिसेंबरअखेर बाजारात येणाऱ्या या संत्र्याला ५० हजार रुपये प्रति टनाचा दर मिळेल, अशी शक्‍यता श्रीधर ठाकरे व्यक्‍त करतात. हैदराबाद, बंगलौर, केरळ, जम्मू काश्‍मीर, सिलीगुडी, दिल्ली या भागात संत्र्याला सर्वाधिक मागणी आहे.

प्रतिक्रिया
वातावरणातील बदलामुळे या वर्षी ६० टक्‍के फळगळ झाली. त्यामुळे बाजारात संत्री कमी आणि मागणी जास्त. यामुळे दर तेजीत आले आहेत. २०१५-१६ या वर्षात चार हजार ते १६ हजार रुपये प्रति टन असा दर होता. यावर्षी ३५ ते ४० हजारावर दर पोचले. आंबीया १५ सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत राहतो. जानेवारीपासून मृगाची संत्री बाजारात राहतात, ती दहा एप्रिलपर्यंत मिळतात. 
- श्रीधर ठाकरे, अध्यक्ष, महाऑरेंज

इतर अॅग्रो विशेष
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...
उजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर  : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...
बाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...
अवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...
विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...
समृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...
साखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...
कॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...
पिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...
‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...
पूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...
दुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर :  राज्यात यंदा...
पेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...
उसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...
राजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...