बाजार समित्या रद्द केल्यास किंमत मोजावी लागेल ः शरद पवार
विजय गायकवाड
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

जगात पेट्रोल व डिझेलचे दर कमी होत असताना देशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. यामुळे महागाई वाढत असून, त्याची झळ सर्वसामान्य कुटुंबांना सोसावी लागत आहे.
-शरद पवार, माजी केंद्रीय कृषीमंत्री

मुंबई ः सरकारची धोरणे रोज बदलत आहेत. बाजार समित्या कशाला ठेवायच्या, असा प्रश्न काही लोक उपस्थित करत आहेत. बाजार समित्या जर रद्द केल्या, तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला मोजावी लागेल, असा इशारा माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी (ता. २५) दिला.

स्व. अण्णासाहेब पाटील यांची ८४ वी जयंती आणि माथाडी कामगारांचा मेळावा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडला, त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, माजी आमदार विजय सावंत, गुलाबराव जगताप, पोपटराव देशमुख आदी कामगार नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमासाठी अनुपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांची एक संघटना बांधली, त्या संघटनेचे एका वटवृक्षात रूपांतर झाले आहे. तसेच, त्यांनी माथाडी कामगारांसाठी अनेक योजना आणल्या.’’ सध्याच्या परिस्थितीत माथाडी कामगारांसाठी अडचणीचा काळ असल्याचे सांगत पवार म्हणाले, ‘‘सरकारची धोरणे रोज बदलत आहेत. बाजार समित्या कशाला ठेवायच्या, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला होता.

बाजार समित्या जर रद्द केल्या, तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला मोजावी लागेल. कामगारांसाठी अनेक बोर्ड आहेत, ज्यांवर अद्यापही अध्यक्षांची नेमणूक झालेली नाही. कामगारांची कामे होत नाहीत. जर मुख्यमंत्री आजच्या मेळाव्यात उपस्थित असते, तर त्यांच्यासमोर कामगारांचे प्रश्न मांडले असते. मात्र, मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र वेळ घेऊन माथाडींचे प्रश्न मांडण्यात येतील.

नाशिक येथे माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न येत्या काळात चर्चा करून मार्गी लावू. राज्यात असुरक्षित कामगारांची संख्या वाढत चालली आहे, ही गंभीर बाब असल्याचे नमूद करत पवार म्हणाले, ‘‘कंत्राटी कामगारांचे प्रमाण वाढत आहे. सरकार त्यांना कोणतेही संरक्षण देत नाही. कंत्राटी कामगार सुरक्षित नाहीत हे चांगले नाही.

देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. जगात पेट्रोल व डिझेलचे दर कमी होत असताना देशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. यामुळे महागाई वाढत असून, त्याची झळ सर्वसामान्य कुटुंबांना सोसावी लागत आहे.’’ याचा आपण विचार करायला हवा, जागरूक व्हायला हवे, असेही श्री. पवार म्हणाले.

या वेळी गुणवंत कामगारांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
शेतशिवारांत लवकरच 'ड्रायव्हर' विना...पुणे : सर्जा-राजाच्या परंपरेने चालणाऱ्या भारतीय...
कतृर्त्वाचे उजळले दीप घरची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. शिक्षण पूर्ण...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...