मुहूर्ताच्या कापसाला प्रतिक्‍विंटल ४५०९ रुपयांचा भाव

वरोरा येथे कापूस खरेदीची सुरवात झाली. या वेळी कापसाची पहिली गाडी आणणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला
वरोरा येथे कापूस खरेदीची सुरवात झाली. या वेळी कापसाची पहिली गाडी आणणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला

चंद्रपूर ः वरोरा बाजार समिती अंतर्गत असलेल्या वरोरा व माढेली येथे खासगी कापूस खरेदीची सुरवात झाली. या वेळी मुहूर्ताच्या कापसाला ४५०९ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला; तर पहिल्याच दिवशी ४५० क्‍विंटल कापसाची खरेदी झाली.  वरोरा येथे मुहूर्ताला कापूसविक्रीसाठी आणणारे शेतकरी रामदास उमरे, भारत तेलंग, आनंद टाले, मिलिंद जोगीकर या शेतकऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. माढेली येथे सुभाष सुराना, शाम पटवडे, नारायण महाकुळकर, वाल्मीक ताजने या शेतकऱ्यांनी मुहूर्ताला कापूस विक्रीसाठी आणला. बाजार समितीचे सभापती विशाल बदखल, जिनिंग संचालक प्रकाशचंद मुथा, बाजार समिती संचालक किशोर भलमे, केंद्र प्रमुख जितेंद्र कुकडे, वरोरा बाजार समितीचे संचालक देवानंद मोरे, सचिव चंद्रसेन शिंदे, श्रीकांत तारेवार या वेळी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com