सांगलीत गुळाच्या दरात वाढ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
सांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर गुळाची आवक वाढली आहे. येथील गुळाला राज्यासह परराज्यांतून मोठी मागणी आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा गुळाच्या दरात सरासरी प्रतिक्विंटल ७०० रुपयांची वाढ झाली आहे.
 
गुळाला सरासरी ४१३८ रुपये असा दर मिळत आहे. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. सांगलीत कर्नाटक राज्यातून गुळाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवाळीपर्यंत गुळाचे दर अजून वधारणार असल्याचे बाजार समिती आणि व्यापारी वर्गांनी सांगितले. 
 
गेल्यावर्षी पाणीटंचाईमुळे उसाच्या क्षेत्रात घट झाली होती. याचा परिणाम गूळ उत्पादकांवरही झाला होता. त्यामुळे गूळ उत्पादन करणारी गुऱ्हाळ घरेही लवकर बंद झाली होती. यामुळे काही प्रमाणात गुळाचे उत्पादनही घटले होते.
 
गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान सरासरी गुळाला प्रतिक्विंटल ३ हजार असा दर होता. मात्र, यंदाच्या हंगामात प्रतिकूल परिस्थितीमध्ये बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली होती. त्यानुसार त्यांनी गूळ उत्पादनही घेण्यासाठी नियोजन केले होते. बाजारात गुळाला अधिक मागणी आहे. यामुळे गुळाचा दरातही वाढ झाली आहे. 
 
गेल्या वर्षी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर गुळाचे दर ३२५० रुपये प्रतिक्विंटल असे होते. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा थोडासा आर्थिक फटकादेखील बसला. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रतिक्विंटलमागे सातशे रुपयांनी वाढ झाली आहे.
 
सांगली बाजार समितीत आवक झालेला गूळ
(आवक व दर क्विंटलमध्ये)
 
तारीख आवक किमान कमाल सरासरी
12 ऑक्‍टोबर 8580 3500. 4775 4138
11 ऑक्‍टोबर 9327 3700 4560 4130
10 ऑक्‍टोबर 2260 3700 4520 4410
9 ऑक्‍टोबर 2468 3730 4480 4105

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com