Agriculture News in Marathi, Prices of onion have risen in Karnataka | Agrowon

कर्नाटकात कांदा वधारला
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017
नवी दिल्ली ः कर्नाटकात खरीप हंगामातील कांदा उत्पादन घटले अाहे. त्यात मागणी अधिक अाणि अावक कमी झाल्याने कांद्याचे दर गेल्या अाठवडाभरात वधारले अाहेत. पुढील महिन्यातही कांद्याचे दर चढेच राहणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली अाहे.
 
सध्या कर्नाटकातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर प्रतिक्विंटल २,०००-२,४०० रुपये असे अाहेत. पुढील महिन्यात कांद्याचा दर प्रतिक्विंटल २,८०० रुपयांवर पोचण्याची शक्यता अाहे, असा अंदाज कर्नाटकातील बाजार समित्यांमधील व्यापारी संघटनेचे प्रमुख बी. एल. शंकरअप्पा यांनी व्यक्त केला अाहे.
 
नवी दिल्ली ः कर्नाटकात खरीप हंगामातील कांदा उत्पादन घटले अाहे. त्यात मागणी अधिक अाणि अावक कमी झाल्याने कांद्याचे दर गेल्या अाठवडाभरात वधारले अाहेत. पुढील महिन्यातही कांद्याचे दर चढेच राहणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली अाहे.
 
सध्या कर्नाटकातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर प्रतिक्विंटल २,०००-२,४०० रुपये असे अाहेत. पुढील महिन्यात कांद्याचा दर प्रतिक्विंटल २,८०० रुपयांवर पोचण्याची शक्यता अाहे, असा अंदाज कर्नाटकातील बाजार समित्यांमधील व्यापारी संघटनेचे प्रमुख बी. एल. शंकरअप्पा यांनी व्यक्त केला अाहे.
 
सध्या येथील बाजार समित्यांमध्ये होणारी कांद्याची अावक गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी अाहे. पाऊस कमी झाल्याने कर्नाटकातील खरिपातील कांदा उत्पादन १३ लाख टनांवरून ४,४९,०००-४,९४,००० टनांपर्यंत खाली अाले अाहे.  कर्नाटकातील विविध बाजार समित्यांमध्ये अातापर्यंत ६,३८० टन कांद्याची अावक झाली अाहे.
 
गेल्या वर्षी याच कालावधीत १७,२८३ टन कांदा अावक झाली होती, अशी माहिती राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन अाणि विकास फेडरेशनने दिली अाहे. 
 
कांदा उत्पादनात कर्नाटक देशात दुसऱ्या क्रमाकांवर अाहे. येथे खरिपापूर्वी अाणि खरीप हंगामात राज्यातील एकूण उत्पादनाच्या ९० टक्के उत्पादन घेतले जाते.
 
गेल्या जुलै महिन्यात कांद्याचे दर प्रतिक्विंटल ३००-४०० रुपयांपर्यंत घसरले होते. या पार्श्वभूमीवर खरिपात कांद्याची कमी लागवड झाली होती. त्यात कमी पावसाचा फटका कांदा उत्पादनाला बसला अाहे.
 
प्रमुख बाजार समित्यांत अावक कमीच
गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत अाहे. त्यामुळे देशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची अावक कमी होत असल्याचे चित्र दिसत अाहे. कांदा उत्पादनात अाघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातील अाणि मध्य प्रदेशातील कांदा जेव्हा बाजारात येईल; त्यावेळी कांद्याचे दर काही प्रमाणात कमी होतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी बांधला अाहे.
 
महाराष्ट्रातही दर वधारणार
गुजरात अाणि राजस्थानमध्ये पुरामुळे कांद्याचे नुकसान झाले अाहे. यामुळे या राज्यांतूनही कांद्याची अावक कमी अाहे. अाशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या महाराष्ट्रातील लासलगाव येथे पुढील महिन्यात कांद्याचे घाऊक दर प्रतिक्विंटल ३,५००-३,७०० रुपयांपर्यंत पोचतील, असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला अाहे.
 
लासलगाव येथे कांद्याचे दर प्रतिक्विंटल २,४०० -२,७०० रुपयांवर पोचले अाहेत. सणाच्या पार्श्वभूमीवर कांद्याला मागणी वाढून दर वधारण्याची शक्यता अाहे. अाॅक्टोबरच्या अखेरीस कांद्याचे घाऊक दर प्रतिक्विंटल ३,५००-३,७०० रुपयांवर पोचणे अपेक्षित अाहे, असे लासलगाव येथील व्यापारी मनोज जैन यांनी म्हटले अाहे.

इतर अॅग्रोमनी
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...
अर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...
कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...
सातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...
हळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...
हळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात नाताळच्या सुटीमुळे आंतरराष्ट्रीय...
ग्राहकाला आधारसक्ती केल्यास 1 कोटींचा...नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन...
युरियाची आयात ४२ लाख टनांवरनवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील...
मका, हळद वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...