मुंबईत शेतमाल आवक घटल्याने दर वाढले

भाजीपाला
भाजीपाला

मुंबई ः राज्यातून माॅन्सून परतला असून, दिवाळी आणि सणासुदीत बाजार समितीमधील आवक घटल्याने कमी प्रतीच्या शेतमालाचेही दर मात्र वाढले आहेत. बुधवारी (ता. २५ ) बाजार समितीत ५५० ट्रक भाजीपाला आवक झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता.२४) बाजार समितीमध्ये लसणाची ४८० क्विंटल आवक झाली. त्यास २६०० ते ४६०० व सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर होता. राज्यातील पावसाने उसंत घेतली असली तरी शेतमालाची स्थानिक आवक घटली आहे. पावसाने खराब झालेल्या शेतमालासह परराज्यांतून शेतमालाची आवक सुरू आहे. मंगळवारी १७९२० क्विंटल कांदा आवक होऊन दर रुपये त्यास ३००० ते ३८०० व सरासरी ३४०० रुपये प्रतिक्विंटल दर होते. बटाट्याची ११४०० क्विंटल आवक होऊन ६०० ते १२०० व सरासरी ९०० रुपये प्रतिक्विंटल दर होते. वांग्याचे दरदेखील वाढले असून टॉमेटोसह गाजर, कोबी, फ्लॉवरसह इतर भाज्यांचे मागील आठवड्याच्या तुलनेत वाढले आहेत. वाशीतील बाजार समितीत लिंबाची १९१५ क्विंटल आवक होऊन ८० ते १४० रुपये प्रतिशेकडा भाव मिळाला. वाटाण्याची ४४२ क्विंटल आवक होऊन त्यास ९००० रुपये दर मिळाला, असे येथील व्यापारी नानासाहेब बोरकर यांनी सांगितले. टोमॅटोला प्रतिक्विंटल २३०० रुपयांपर्यंत दर होते. मिरचीची २९९० क्विंटल आवक होऊन सरासरी दर ३८०० रुपयांपर्यंत दर होता.  बाजार समितीतील शेतमालाची आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

शेतमाल     आवक      किमान      कमाल     सरासरी
कांदा     १७९२०     ३०००     ३८००     ३४००
भेंडी     ५९३     ३०००     ३५००     ३३००
फ्लॉवर     १४९८     २०००     ३०००     २५००
गवार     ६१३     ३५००     ४०००     ३७००
शेवगा     १६४     ५०००     ७०००     ६०००
वांगी     २४२     ३४००     ३६००     ३५००
मोसंबी     ३६१०     १५००     २७००     २१००
पपई     २२७६     १६००     ३०००     २३००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com