agriculture news in marathi, The pride of the Sangli Zilla Parishad by the Governor | Agrowon

राज्यपालांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषदेचा गौरव
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

सांगली ः यशवंत पंचायतराज अभियान २०१६-१७ मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल मुंबईत जिल्हा परिषदेचा राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (ता. २६) गौरव केला.

सांगली ः यशवंत पंचायतराज अभियान २०१६-१७ मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल मुंबईत जिल्हा परिषदेचा राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (ता. २६) गौरव केला.

अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, माजी अध्यक्षा स्नेहल पाटील, उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी शिराळा, आटपाडी पंचायत समित्यांनाही बक्षीस देण्यात आले. मुंबईतील रवींद्र नाट्यगृृहात यशवंत पंचायतराज अभियानाचे बक्षीस वितरण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे होत्या. यशवंत पंचायतराजमध्ये जिल्हा परिषदेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. शिराळा पंचायत समितीने राज्य पातळीवर, तर आटपाडी पंचायत समितीने पुणे विभागात प्रत्येकी तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल गौरव करण्यात आला.

जिल्हा परिषदेने स्वच्छता, सामान्य प्रशासनासह सर्वच विभागांत केलेल्या लक्षवेधी कामगिरीच्या जोरावर २०१६-१७ या वर्षाचा राज्याचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला होता. तो स्वीकारण्यासाठी जुने-नवे पदाधिकारी एकत्र गेले. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या. दिव्यांग अभियानासारख्या राज्यासमोर आदर्श ठरलेल्या नावीण्यपूर्ण योजना राबवण्यात आल्या. स्वच्छ भारत अभियानमध्ये तर जिल्हा परिषदेने झपाटून काम केले. मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव झाला. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देशमुख, उपाध्यक्ष बाबर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त सीईओ विक्रांत बगाडे उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे स्थान बळकट ः संग्रामसिंह देशमुख
राज्यात मिळालेल्या पहिल्या स्थानामुळे जिल्हा परिषदेचे स्थान आणखीच बळकट होऊन पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास आणखीनच बळावल्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे अंमलबजावणी केली. दिव्यांग अभियान राज्यासमोर आदर्श नावीण्यपूर्ण योजना ठरली. स्वच्छ भारत अभियानामध्ये तर जिल्हा परिषदेने झपाटून काम केल्याने यश मिळाले.

इतर बातम्या
हॉर्सशू खेकडे हे कोळ्यांच्या अत्यंत...घोड्याच्या पायासारख्या दिसणाऱ्या खेकड्यांना...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
देहूगाव-लोहगाव गटाच्या पोटनिवडणुकीत...पुणे : सदस्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळल्याने...
पुणे-मुळशी बाजार समितीच्या विलीनीकरणास...पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची पाचव्यांदा...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
जलसंवर्धन आणि नियोजनासाठी संशोधनात्मक...औरंगाबाद : ज्याप्रमाणे अन्नधान्य टंचाईच्या काळात...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
खानदेशात तूर खरेदीबाबत ऑफलाइन नोंदणी...जळगाव ः खानदेशात तूर खरेदीसंबंधी शासकीय...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...