agriculture news in marathi, Prime Minister appreciates in Morna Cleanliness peoples Campaign in his Man Ki Bat | Agrowon

मोर्णा स्वच्छता अभियानाची पंतप्रधानांकडून दखल
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

'मन की बात’मध्ये लोकचळवळीचे काैतुक
‘सकाळ’ने सुरू केली होती संवर्धनाची चळवळ

'मन की बात’मध्ये लोकचळवळीचे काैतुक
‘सकाळ’ने सुरू केली होती संवर्धनाची चळवळ

अकोला : अकोला शहराची जीवनवाहिनी प्रदूषणामुळे विषवाहिनी झाली. या जीवनवाहिनीला स्वच्छ करण्याचा विडा अकोलेकरांनी उचलला आणि पाहतापाहता ही लोकचळवळ उभी झाली. मोर्णा नदी स्वच्छतेसाठी अकोलेकरांनी घेतलेल्या पुढाकाराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन २०१८ या वर्षातील पहिल्याच ‘मन की बात’मध्ये त्यांनी या लोकचळवळीचे काैतुक केले. २०१६ मध्ये ‘सकाळ’ने सुरू केलेली मोर्णा संवर्धनाची चळवळ जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने लोकचळवळ झाली आणि त्याची दखल देशपातळीवर घेतली गेली.

मोर्णा नदी जलकुंभीमुळे प्रदूषित झाली. तिला मोकळा श्‍वास घेता यावा म्हणून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेत मोर्णा नदी स्वच्छतेला लोकचवळीचे स्वरूप दिले. या वर्षीच्या सुरवातीलाच त्यांनी लोकसहभागातून ही नदी स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आणि पाहतापाहता ‘मिशन मोर्णा’ला लोकचळवळीचे स्वरूप मिळाले. दर शनिवारी मोर्णा नदीच्या काठावर अकोलेकरांनी एकत्र येऊन विषवाहिनीला गतवैभव मिळून देण्यासाठी योगदान दिले. या चळवळीत शंभरपेक्षा अधिक स्वयंसेवी संस्था आणि सहा हजारांपेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेऊन नदी स्वच्छतेचा एक आदर्श देशापुढे ठेवला. त्याचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी रविवारी देशातील नागरिकांपुढे ‘मन की बात’ बात ठेवताना केला. अकोलेकरांच्या या सकारात्मक कार्याचा हा गाैरव असून, त्यातून मोर्णा नदी स्वच्छतेच्या अभियानाला आणखी बळ मिळणार आहे.

‘सकाळ’चा पुढाकार
मोर्णा नदी संवर्धनाची संकल्पना सर्वप्रथम ‘सकाळ’ने मांडली. त्यासाठी कार्यक्रम हाती घेतला. मोर्णा नदीच्या काठावर स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. मोर्णा नदीच्या काठावर विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमही ‘सकाळ’च्या वतीने घेण्यात आले. ‘सकाळ’ची संकल्पना जिल्हा प्रशासनाने भरभक्कमपणे राबविली. त्याला नागरिकांनीही जोमदार प्रतिसाद दिला. नदी साफ करण्यासाठी संपूर्ण शहर एकवटले. ‘सकाळ’च्या संकल्पनेने आता लोकचळवळीचे रूप धारण केल्याची ही अद्‍भुत घटना आहे.

इतर अॅग्रो विशेष
लातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...
जळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव  ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...
विकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...
मॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...
विदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...
कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...
‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...
कृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...
‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...
मोदी सरकार पास की नापास? बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...
भारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...
माॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...
जॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...
मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...
गोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...
छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...
चला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...
विशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...
मोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...
विवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...