agriculture news in Marathi, prime minister modi observe deals of Currant in Sangali , Maharashtra | Agrowon

सांगलीतील बेदाणा सौद्याची पंतप्रधान मोदींकडून पाहणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 मार्च 2018

सांगली ः येथील बेदाण्याच्या ऑनलाइन सौद्याची माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतून लाइव्ह घेतली. शनिवारी (ता.१७) या सौद्यात काही क्षणांसाठी तेही सहभागी झाले. त्यामुळे व्यापारी, दलाल, खरेदीदारांमध्ये चांगला उत्साह पाहायला मिळाला. 

शेतीमालाला सुलभ बाजारपेठ उपलब्ध व्हावी, योग्य भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी व्यापार (ई-नाम) हा ऑनलाइन मार्केटिंग उपक्रम सुरू केला आहे. सांगली मार्केट यार्डमधील बेदाण्याचा ई-लिलाव पंतप्रधान नरेंद्र मोदी; तसेच राज्य व केंद्राचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

सांगली ः येथील बेदाण्याच्या ऑनलाइन सौद्याची माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतून लाइव्ह घेतली. शनिवारी (ता.१७) या सौद्यात काही क्षणांसाठी तेही सहभागी झाले. त्यामुळे व्यापारी, दलाल, खरेदीदारांमध्ये चांगला उत्साह पाहायला मिळाला. 

शेतीमालाला सुलभ बाजारपेठ उपलब्ध व्हावी, योग्य भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी व्यापार (ई-नाम) हा ऑनलाइन मार्केटिंग उपक्रम सुरू केला आहे. सांगली मार्केट यार्डमधील बेदाण्याचा ई-लिलाव पंतप्रधान नरेंद्र मोदी; तसेच राज्य व केंद्राचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

ऑनलाइन सौद्यांसाठी बाजार समितीने सहा कॅमेरे बसविले होते. ज्याच्या माध्यमातून येथील बेदाणा दिल्लीत दिसत होता; तर येथील व्यापाऱ्यांना मागणीनुसार ऑनलाइन विक्री करता यावी, यासाठी वाय-फायची सोय करण्यात आली होती. 
ऑनलाइन सौद्यांसाठी अडीच टन बेदाण्याची आवक झाली होती. १४० शेतकऱ्यांचा बेदाणा होता. दिल्लीत बोली लागली. या ऑनलाइन बोलीमधून १३५ रुपयांपासून १८६ रुपयांपर्यंत दर मिळाला. 

या वेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, उपसभापती तानाजी पाटील, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, पणनचे लोखंडे, अरविंद पॉल, संचालक संतोष पाटील, तानाजी पाटील, दादासाहेब कोळेकर, वसंतराव गायकवाड, अजित बनसोडे, प्रशांत पाटील, सचिव पी. एस. पाटील, एन. एम. हुल्याळकर, बेदाणा असोसिएशनचे मनोज मालू, राजू कुंभार यांच्यासह बेदाणा व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.
 

इतर अॅग्रो विशेष
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...
मंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...
गेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...
उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...
पूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...
कांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...
खानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...
अडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे  : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...
अमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...
‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी  : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...
ऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...