पंजाबमध्ये खासगी उद्योगांची भातखरेदी वाढली

भात
भात

चंडीगड ः जागतिक तसेच भारतातील भात उत्पादनात घट होणार असल्याचा सुधारित अंदाज नुकतेच संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेने व्यक्त केला आहे. त्यामुळे भविष्यात भाताचा तुटवडा जाणून दर वाढतील, असा अंदाज बांधून याचा लाभ घेण्यासाठी पंजाबमध्ये खासगी उद्योगांची बिगर बासमती भात खरेदी दुपटीने वाढली आहे.  पंजाबमध्ये आतापर्यंत खासगी उद्योगांनी २ लाख टन भाताची खरेदी केली आहे. मागील वर्षी पूर्ण हंगामात खासगी उद्योगांनी केवळ १.५ लाख टन भात खरेदी केला होता. यंदा त्यात वाढ झाली आहे. २०१७ च्या हंगामात पंजाबमध्ये १६५ लाख टन भात उत्पादन झाले होते. परतीच्या पावसाने पंजाब व देशातील अनेक भागांत भातपिकाचे नुकसान केल्याने उत्पादनात घट होणार आहे. तसेच येणाऱ्या काळात जागतिक बाजारातही भाताचा तुटवाडा जाणवू शकतो, त्यामुळे निर्यातीसाठी बिगर बासमती भाताची खरेदी वाढली आहे. अलीकडच्या काळात भारताची बिगर बासमती भातीची निर्यात बासमती भातापेक्षा जास्त वाढली आहे. २०१६-१७ मध्ये भारतातून बिगर बासमती भाताची ६८ दशलक्ष टन निर्यात झाली होती. यंदा एप्रिल ते आॅगस्ट २०१७ या काळात ३२ लाख टन बिगर बासमती भाताची निर्यात झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com