agriculture news in marathi, Priyanka Gandhi appointed as AICC general secretary for Eastern UP | Agrowon

काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात
वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांनी राजकारणात अधिकृतरित्या केलेला हा प्रवेश आहे.

काँग्रेसचे सरचिटणीसपदी प्रियंका गांधी यांची नियुक्ती करून काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी खेळी केली असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. प्रियंका गांधी प्रसिद्ध उद्योगपती रॉबर्ट वड्रा (वढेरा) यांच्या पत्नी आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांनी राजकारणात अधिकृतरित्या केलेला हा प्रवेश आहे.

काँग्रेसचे सरचिटणीसपदी प्रियंका गांधी यांची नियुक्ती करून काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी खेळी केली असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. प्रियंका गांधी प्रसिद्ध उद्योगपती रॉबर्ट वड्रा (वढेरा) यांच्या पत्नी आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणात यावे, अशी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र, आतापर्यंत प्रियंका यांनी राजकारण प्रवेशाचे संकेत दिले नव्हते. 'प्रियंका यांच्यामध्ये इंदिरा गांधी यांची छबी दिसते', अशीही चर्चा सुरू असते.

उत्तर प्रदेशचे मैदान जिंकणे ही लोकसभा निवडणुकीतील एक महत्त्वाची बाब असते. हीच बाब ओळखून गेल्या निवडणुकीमध्ये खुद्द नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधून जागा लढविली होती. याचा सकारात्मक परिणाम होत भाजपला उत्तर प्रदेशमध्ये घवघवीत यश मिळाले होते. आता लोकसभा निवडणुकीला काही महिने बाकी असतानाच प्रियंका यांच्या राजकारण प्रवेशामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

''माझी बहिण प्रियंका उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकांमध्ये माझ्या बरोबर असेल, याचा मला खूप आनंद आहे. ती अत्यंत सक्षम आहे,'' अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी दिली आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...