agriculture news in marathi, prize distribution programme, pune, maharashtra | Agrowon

`शेतकऱ्यांची थट्टा कशाला करता?`
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 मार्च 2018
पुणे  : डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव शेतीमालाला देऊ ही अाश्‍वासने सरकार पाळत नाही. शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी घोड्यावरून केली जाते, कधी रात्री पाहणी केली जाते. शेतकऱ्यांच्या गळ्यात आरोपीसारख्या पाट्या घातल्या जातात. सरकारने अक्षरश: पोरखेळ चालविला आहे. या शेतकऱ्यांच्या जोरावर तुम्ही राज्यकर्ते झाला. त्या शेतकऱ्यांची थट्टा कशाला करता? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला केला. 
 
पुणे  : डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव शेतीमालाला देऊ ही अाश्‍वासने सरकार पाळत नाही. शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी घोड्यावरून केली जाते, कधी रात्री पाहणी केली जाते. शेतकऱ्यांच्या गळ्यात आरोपीसारख्या पाट्या घातल्या जातात. सरकारने अक्षरश: पोरखेळ चालविला आहे. या शेतकऱ्यांच्या जोरावर तुम्ही राज्यकर्ते झाला. त्या शेतकऱ्यांची थट्टा कशाला करता? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला केला. 
 
जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या डाॅ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार, अादर्श गोपालक पुरस्कार, शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कारांचे वितरण शनिवारी (ता. २३) श्री. पवार यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके यांच्यासह जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्य या वेळी उपस्थित होते. 
 
श्री. पवार म्हणाले, की उत्पादन खर्चाच्या दीडपट शेतीमालाला भाव देण्याचे अाश्‍वासन दिले; मात्र सरकारमध्ये गेल्यावर भाव देता येत नाही. साखर, भाजीपाल्याला भाव नाही. शेतकऱ्यांच्या दुधाला १९ ते २० रुपये लिटर आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला दहा रुपयांचा अधिकचा भाव दिला पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर चार रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी नाही. खतांच्या किमती, वीजदर, पाणीपट्टी वाढवता. मग शेतीमालाचे दर का वाढवत नाही. सरकारची धोरणेच चुकीची आहेत, अशी टीका श्री. पवार यांनी केली.  

शहराला पाणी दिले पाहिजेच, त्याचबरोबरच खडकवासला प्रकल्पातून हवेली, दौंड, इंदापूर तालुक्याला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. मुळशी धरणाचे पाणी टाटाची वीज तयार करण्यासाठी जाते. वीजनिर्मितीचे विविध पर्याय उपलब्ध असल्याने मुळशीचे पाच टीएमसी पाणी पुण्याला द्यावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली. मुळशीचे पाणी पुण्याला मिळाले, तर खडकवासलामधून शेतकऱ्यांना अधिकचे पाणी देता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार जूनपर्यंत सरसकट कर्जमाफी देणार, अशी घोषणा केली जाते, तर अधिकारी त्याला विरोध करतात. आता अधिकारीच डोईजड झाले आहेत. आमच्या काळात अधिकाऱ्यांची असे सांगायची ताकद नव्हती. अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची धमक दुर्देवाने अलीकडच्या नेतृत्वात दिसत नाही. विजेच्या जोडण्या तोडण्यास सुरवात केली आहे. त्यावर सरकारने वीज तोडणार नसल्याचे सांगितले. आता अधिकारी काय करतात ते कळेल, असेही त्यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...