agriculture news in Marathi, problem in quality control work due to vacancies, Maharashtra | Agrowon

‘गुण नियंत्रण’च्या कामात रिक्‍त पदांचा खोडा
विनोद इंगोले
मंगळवार, 10 एप्रिल 2018

या वर्षीच्या हंगामात गुण नियंत्रणाचे काम प्रभावीपणे केले जाणार आहे. गतवर्षीच्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. गुण नियंत्रण विभाग किंवा एका अधिकाऱ्यावर अवलंबून न राहता कृषी विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून एेनवेळी कृषी केंद्राची झडती घेतली जाईल. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल आणि गुण नियंत्रणाचे काम प्रभावीपणे होईल.
- सचिंद्र प्रताप सिंह, कृषी आयुक्‍त

अमरावती ः अनुभवावरून शहाणे होत या वर्षीच्या हंगामात गुण नियंत्रणातील दोष रोखण्याचा प्रयत्न कृषी विभाग करेल, अशी अपेक्षा होती. परंतु, या वर्षीदेखील रिक्‍त पदांमुळे कृषी निविष्ठांच्या गुण नियंत्रणाच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यासह राज्यात गेल्यावर्षी कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हर्बीसाईड टॉलरंज (तणरोधक) बियाणेदेखील विकल्या गेले. अनिर्बंधीत कीडनाशकाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना विषबाधा होत २२ जणांचे जीव गेले. गेल्यावर्षीच्या या घटनांपासून बोध घेत कृषी विभाग या हंगामात सावध पावित्रा घेईल, अशी अपेक्षा होती.

परंतु, या वर्षीच्या हंगामात गुण नियंत्रणाच्या कामात रिक्‍त पदांचा अडसर ठरण्याची भीती वर्तविली जात आहे. वाशीम, बुलडाणा तसेच यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गुण नियंत्रणात मोठी भूमिका बजावणाऱ्या कृषी विकास अधिकाऱ्यांचे पद रिक्‍त आहे. अमरावतीला उदय काथोडे तर अकोल्यात हनुमंत ममदे हेच पूर्णवेळ कृषी विकास अधिकारी आहेत.

यवतमाळात गुण नियंत्रण रामभरोसे
कृषी विकास अधिकारी, मोहीम अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी ही पदे गुण नियंत्रणात महत्त्वाची ठरतात. यवतमाळ जिल्ह्यात ही सारीच पदे गेल्या वर्षभरापासून रिक्‍त आहेत. कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे तर गुण नियंत्रण अधिकाऱ्याचा प्रभार लतीश एडवे यांच्याकडे आहे. लतीश एडवे हे मंडळ कृषी अधिकारी आहेत. कैलास वानखेडे कृषी विकास अधिकाऱ्याच्या प्रभाराला कंटाळले असून त्यांनी वारंवार हा प्रभार काढण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. दत्तात्रय कळसाईत यांच्या निलंबनानंतर वानखेडे यांच्याकडे केवळ दोन महिन्यांच्या बोलीवर प्रभार सोपविण्यात आला होता. 

विभागात गुण नियंत्रणाचा वालीच नाही
अमरावती येथील जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी पुरुषोत्तम कडू यांनी ऐच्छीक सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर हे पद भरले गेले नाही. अकोला येथील मोहीम अधिकारी अरुण गावंडे ३१ मार्चला सेवानिवृत्त झाले. बुलडाणा कृषी विकास अधिकारी भराड यांचे निधन झाले. श्री. बारापात्रे यांच्याकडे वर्षभरापासून त्यांचा प्रभार आहे. बुलडाणा जिल्हा कृषी अधिकारी पदही रिक्‍त आहे. वाशीमचे कृषी विकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. या पदावरही त्यानंतर कोणाचीच नेमणूक झाली नाही.

इतर अॅग्रो विशेष
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...