जळगाव जिल्ह्यातील शिक्षक समायोजनात घोळ

जळगाव जिल्ह्यातील शिक्षक समायोजनात घोळ
जळगाव जिल्ह्यातील शिक्षक समायोजनात घोळ

जळगाव : जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे शिक्षक समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र अनेक ठिकाणी ती पूर्ण झालेली नाही. चोपडा तालुक्‍यातील शिक्षकांचे समायोजन अद्यापही रखडले आहे. यात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप करीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या वेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिक्षण सभापती पोपट भोळे, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, आरोग्य सभापती दिलीप पाटील, महिला व बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, संजय मस्कर, शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे, मधुकर काटे आदी उपस्थित होते.

गटशिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन यांनी केली. त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. भोळे यांनी पारोळा तालुक्‍यातील वात्सर येथील, तर कैलास सरोदे यांनी रावेर तालुक्‍यातील वाघोदा खुर्द येथील शाळेभोवतीचे अतिक्रमण काढण्याची मागणी केली. उदळी येथील पाणीपुरवठा जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून गावास पाणीपुरवठा करण्यात आला आहे. परंतु जलकुंभ गळतीमुळे दुरुस्तीसाठी रक्कम राखून ठेवण्यात आली असल्याचा अहवाल पाणीपुरवठा विभागातर्फे सादर करण्यात आला.

रावसाहेब पाटील यांच्या मागणीनुसार चिंचपुरे येथील घरकुलाच्या यादीत घोळ झाला असलेल्या मुद्द्याबाबत चौकशीचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com