agriculture news in Marathi, problem of weather center in crop insurance, Maharashtra | Agrowon

विमा योजनेत हवामान केंद्रांचा घोळ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

हवामान केंद्र व महसूल मंडळांचा घोळ हेतूपुरस्सर घालून शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित कसे राहतील, असा प्रयत्न शासन व इतर यंत्रणांनीच केला आहे. विमा कंपनीशी हातमिळवणी करून हा प्रकार सर्वांनी ठरवून केला असावा, असे वाटते. 
- अनिल सपकाळे, केळी उत्पादक, करंज, जि. जळगाव

जळगाव ः यंदा जाहीर झालेल्या फळ पीक विमा योजनेतही हवामान केंद्रांचा घोळ कायम आहे. ज्या गावांत हे केंद्र आहे, त्याच गावांतील हवामानासंबंधी संबंधित केंद्राचे आकडे न घेता दुसऱ्या केंद्राचे आकडे घेतले जाणार आहेत. हा घोळ मिटवून महसूल मंडळनिहाय हवामान केंद्रे असावीत, अशी अपेक्षा केळी व इतर फळ पिके घेणाऱ्या विमाधारक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 जळगावसह रावेर, यावल आदी भागांत हा हवामान केंद्र व महसूल मंडळांचा घोळ केंद्र सरकारच्या क्रॉप इन्श्‍युरन्स संस्थेने घातल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला असून, हा प्रकार शासन व विमा कंपनीची मिलिभगत असल्याचेही म्हटले आहे.

जळगाव तालुक्‍यात १० महसूल मंडळे आहेत. परंतु केंद्राच्या क्रॉप इन्श्‍युरन्स संस्थेने फळ पीक व इतर विमा योजनांसाठी फक्‍त आसोदा, नशिराबाद, भोकर व म्हसावद ही चारच महसूल मंडळे निश्‍चित केली. यात घोळ असा आहे की, आसोदा येथे हवामान यंत्र असताना आसोदा गाव मात्र म्हसावद महसूल मंडळाला जोडले आहे. म्हणजे आसोदा येथे गारपीट, वादळ झाले, तापमानात चढउतार झाले तर आसोदा गावातील हवामान केंद्रात ज्या नोंदी होतील त्या विचारात न घेता आसोदा गावासाठी म्हसावद या गावाच्या नोंदी गृहीत धरल्या जातील. 

म्हसावद व आसोदा या दोन्ही गावांमधील अंतर सुमारे २६ किलोमीटर आहे. तसेच भोकर महसूल मंडळात फक्त पळसोद गाव आहे. भोकर येथे हवामान केंद्र आहे. या केंद्रापासून जी गावे नजीक आहेत, ती गावे मात्र आसोदा महसूल मंडळाला जोडली आहेत. कठोरा हे गाव भोकरपासून चार किलोमीटर अंतरावर आहे. परंतु कठोरा गाव हे आसोदा मंडळाला जोडले असून, ते कठोरापासून सुमारे १५ ते १६ किलोमीटर आहे.

अर्थातच कठोरा येथे जे हवामान असेल तेच आसोदा येथे नसणार व विमा भरपाई देण्याची मागणी आली तर आसोदा येथे जे हवामान होते त्याच्या नोंदींचा हवाला देऊन विमा कंपनी हात वर करील. हा प्रकार जिल्हाभर झाला आहे. जिल्हाभरात विमा योजनेसंबंधी स्कायमेट कंपनीच्या ८९ हवामान केंद्रांची मदत घेतली जाते. महावेद कंपनीने हे केंद्र बसवून घेतले आहे.

कृषी विभाग म्हणतो, केंद्राकडे जावे लागेल
हवामान केंद्र व महसूल मंडळांच्या घोळासंबंधी केळी उत्पादक सत्वशील पाटील (कठोरा, जि.जळगाव), अनिल सपकाळे व इतरांनी फळ पीक विमासंबंधी कार्यरत एचडीएफसी एर्को कंपनीकडे काही दिवसांपूर्वी तक्रार केली. त्यावर यासंदर्भात आपण निर्णय घेऊ शकत नाही, असे या कंपनीने म्हटले. नंतर राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे या घोळाची माहिती दिली, त्यावर कृषी विभागाने ही मंडळे केंद्र सरकारच्या क्रॉप इन्श्‍युरन्स संस्थेने सर्वेक्षण करून निश्‍चित केली आहेत. दुरुस्ती व समस्या मार्गी लावण्यासाठी या संस्थेकडेच पाठपुरावा करावा लागेल, असे स्पष्टीकरण तक्रारदार पाटील यांना दिले.

इतर अॅग्रो विशेष
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...
तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भरआमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा...
बियाणे, लागवड तंत्रात केला बदलसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील...
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...