agriculture news in Marathi, Problems in build for big saylo, Maharashtra | Agrowon

महाकाय सायलो उभारणीत अडचणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 एप्रिल 2018

पुणे : शेतीमाल साठवणुकीसाठी राज्यातील सर्वांत मोठे गोदाम अर्थात सायलो उभारण्यासाठी अनेक अडचणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे भागाला मध्यवर्ती ठेवत बारामती परिसरात राज्यातील पहिल्या महाकाय सायलो उभारणीसाठी चाचपणी केली जात आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

पुणे : शेतीमाल साठवणुकीसाठी राज्यातील सर्वांत मोठे गोदाम अर्थात सायलो उभारण्यासाठी अनेक अडचणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे भागाला मध्यवर्ती ठेवत बारामती परिसरात राज्यातील पहिल्या महाकाय सायलो उभारणीसाठी चाचपणी केली जात आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

सायलो उभारणी ही अतिशय खर्चिक बाब असल्यामुळे भारतीय अन्न महामंडळ व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या संयुक्त प्रयत्नांतून सायलो प्रकल्प उभा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बारामती भागात सध्या आम्हाला प्राप्त होत असलेल्या जागेत सायलोची उभारणी करणे गैरसोयीचे आहे. कारण लोहमार्गापासून प्रकल्पाची जागा दूर असून, तेथे जाण्यासाठी सध्या मालधक्का किंवा लोहमार्ग उभारणीसाठी अफाट खर्च वाढू शकतो. सायलोपेक्षाही इतर पायाभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक होणार असल्यामुळे तूर्तास सायलो प्रकल्पाचा मुद्दा रेंगाळला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘भारतीय अन्न महामंडळाच्या सहकार्याशिवाय सायलो उभारणी अशक्य होती.

या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
मात्र वखार महामंडळाला व्यापारीदृष्ट्या गुंतवणूक केल्यानंतर उत्पन्नात वाढ झाली तरच या प्रकल्पाला पुढे नेले जाणार होते. तथापि, आता पायाभूत सुविधांसाठी खर्च वाढत असल्यामुळे सरकारी धोरणाची वाट पाहणेच योग्य राहील, असेही मत सूत्रांनी व्यक्त केले. बारामतीमध्ये सायलो उभारणी सध्या शक्य वाटत नसली, तरी भविष्यात राज्यात सायलो उभे करावे लागतील. 

महामंडळाने पहिल्या टप्प्यात किमान ५० टन क्षमतेचे सायलो उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सायलोप्रमाणेच आम्ही राज्यात नव्याने उभारल्या जाणाऱ्या ड्रायपोर्ट संकल्पनेत स्थान मिळतेय काय याचीही चाचपणी करीत आहोत. शेतीमालाच्या उत्पादनानंतर साठवणीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे आता शासनाने मान्य केले आहे. त्यामुळे साठवण प्रकल्पांमधील सरकारी गुंतवणूक भविष्यात वाढेल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
नोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
स्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील...सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...
तयारी रब्बी हंगामाची...खरीप पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामासाठी...
ऊसदर नियंत्रण समितीची पहिली बैठक...मुंबई : ऊसदर नियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता.१७...
डाळिंब उत्पादनात घट होण्याची शक्यतासांगली ः राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे...
शास्त्रज्ञ भरती मंडळावर कृषी...पुणे : देशाच्या कृषी शिक्षण संस्थांना नव्या...
शेतमाल तारण योजना न राबविणाऱ्या बाजार... मुंबई : शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा...
सिंचन प्रकल्पांसाठी ६५ हजार कोटी :...नवी दिल्ली ः देशातील सिंचन प्रकल्पांचा विकास...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : पोषक हवामान तयार झाल्याने रविवारी (ता. १६...
अविरत कष्टातून सिंचन, अर्थकारणाला दिले...जयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व...
शेतकऱ्यांकडून घेतलेल्याच दुधाची भुकटी...जळगाव ः राज्यात प्रतिदिन सहकारी व इतर प्रमुख दूध...