agriculture news in marathi, problems in crop insurance are same, Maharashtra | Agrowon

पीकविम्यासाठी मुदत वाढली, पण ऑनलाइन अडचणी कायम
टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 जुलै 2018

एकतर सातबारेच निघत नाहीत, निघाले तर तलाठ्याची सही घ्यावी लागते. तलाठ्याकडे दोन गावांचा अतिरिक्‍त चार्ज, एवढं करून कागदपत्रं जमा केली त सेवा ठप्प. शेतातली कामं करावं का, विमा उतरविण्यासाठी रांगेत लागावं, काही कळनां.
- संतोष बोंद्रे, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद

औरंगाबाद: विमा उतरविण्यासाठी मुदत वाढली, पण आॅनलाइन सेवेचं रडगाणे कायम आहे. त्यामुळे मुदत कितीही वाढविली तरी सेवाच चांगली नाही अन्‌ ऑफलाइन विमा स्वीकारण्याचा निर्णय नाही,  त्यामुळे मुदत वाढवून उपयोग काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, मंगळवारी (ता.२४) आपला विमा उतरविला जावा म्हणून शेतकऱ्यांनी विविध सेवा केंद्र व बॅंकांमध्ये मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. 
कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला विम्याचं सुरक्षा कवच मिळविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. असे असतानाचा सर्व्हर डाउनने मात्र शेतकऱ्यांचा पिच्छा सोडलेला दिसत नाही.

गतिमान व शाश्वत व्यवस्थाच नसताना ऑनलाइन विमा उतरविण्याचा आग्रह कशासासाठी, असा प्रश्न आता शेतकरी विचारू लागले आहेत. विमा उतरविण्याच्या पहिल्या मुदतीनुसार २४ जुलै ही शेवटची तारीख होती. आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे, परंतु गतवर्षी वाढीव  मुदतीत विमा उतरविणाऱ्या विमा परतावा न मिळाल्यामुळे यंदाही वाढीव मुदतीत विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना परताव्यास पात्र ठरलो तर विमा मिळेल की नाही, ही अशी शंका वक्त करत आहेत. त्यामुळे मंगळवारी विविध बॅंक शाखा व सेवा केंद्रावर शेतकऱ्यांनी सकाळीच गर्दी केली. 

मंगळवारी सकाळी थोडा वेळ साइट चालली नंतर पुन्हा साइट बंद पडल्याची माहिती काही केंद्रचालकांनी दिली. शिवाय इंटरनेट सेवाही ठप्प झाल्याने विमा उतरविण्यात अडचण निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आडूळ येथील सहकारी बॅंकेच्या शाखेत सोमवारी सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत विमा उतरविण्यासाठी अर्ज स्वीकारण्यात आले, परंतु मंगळवारी पुन्हा सेवा ठप्प झाली. विमा उतरविण्याची सोय असलेल्या सेवा केंद्रचालकांना आपल्याकडील काही रक्‍कम पोर्टलवर भरून ठेवावी लागते, परंतु सेवाच मिळत नसल्याने ती रक्‍कम निरर्थक अडकून पडल्याची माहिती एका केंद्रचालकाने दिली.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...