agriculture news in Marathi, problems in crop loan viewer form uploading, Jalgaon | Agrowon

खानदेशात कर्जमाफीच्या याद्या अपलोडींगला अडचणी
चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

जळगाव ः धुळे जिल्ह्यातील कर्जमाफीसंबंधीची ९१ हजार ८६८ प्रकरणे तर जळगाव जिल्ह्यातील दोन लाख २७ हजार प्रकरणांचे लेखापरीक्षण अद्याप सुरूच आहे. हे लेखापरीक्षण या आठवड्यात पूर्ण होईल. यातच संबंधित पात्र कर्जदार, नियमित कर्जदारांच्या याद्या आपले सरकार या वेब पोर्टलवर अपलोड करायला सुरवात झाली आहे, परंतु सर्व्हर डाउनमुळे याद्या अपलोड होण्यास अडचण येत आहे.

यातच दिवाळीपूर्वी जळगाव जिल्ह्यातील याद्यांसंबंधीची परंतु लेखापरीक्षणासह संबंधित प्रकरणांच्या याद्या दिवाळीपूर्वी अपलोड होऊन कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरवात होईल, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

जळगाव ः धुळे जिल्ह्यातील कर्जमाफीसंबंधीची ९१ हजार ८६८ प्रकरणे तर जळगाव जिल्ह्यातील दोन लाख २७ हजार प्रकरणांचे लेखापरीक्षण अद्याप सुरूच आहे. हे लेखापरीक्षण या आठवड्यात पूर्ण होईल. यातच संबंधित पात्र कर्जदार, नियमित कर्जदारांच्या याद्या आपले सरकार या वेब पोर्टलवर अपलोड करायला सुरवात झाली आहे, परंतु सर्व्हर डाउनमुळे याद्या अपलोड होण्यास अडचण येत आहे.

यातच दिवाळीपूर्वी जळगाव जिल्ह्यातील याद्यांसंबंधीची परंतु लेखापरीक्षणासह संबंधित प्रकरणांच्या याद्या दिवाळीपूर्वी अपलोड होऊन कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरवात होईल, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

धुळे जिल्ह्यात ९१ हजार ८६८ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसंबंधी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. संबंधित शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज व त्यांनी कर्ज घेतलेली सोसायटी किंवा बॅंक यातील माहितीचे लेखापरीक्षण सुरू आहे. यातच काही शेतकऱ्यांचे दुबार अर्जही आले आहेत. हे दुबार अर्ज लेखापरीक्षण करताना बाहेर काढले जातील. लेखापरीक्षणात जे अर्ज पात्र ठरतील त्यांनाच लाभ मिळेल. हे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन दिवसांत पात्र अर्जांच्या याद्या अपलोड केल्या जातील यानंतर कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात दोन लाख २७ हजार अर्जांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. जळगाव शहरातील जिल्हा देखरेख संघाच्या कार्यालयात यासंबंधीची कार्यवाही सुरू आहे. तसेच पात्र अर्जांच्या याद्या अपलोड करण्याची कार्यवाही सुरू आहे. परंतु सर्व्हर डाउनमुळे अडचणी येत असून, अजून एक लाख अर्जांचे लेखापरीक्षण राहीले आहे. परंतु, या आठवड्यात ही कार्यवाही पूर्ण होईल आणि दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकेल, असा आशावाद जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. 

चावडीवाचन करणार
जळगाव जिल्ह्यात १३८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीसंबंधीची कार्यवाही सुरू होती. आता या पंचायतींमधील निवडणूक आटोपली असून, आचारसंहितेची अडचण नाही. त्यामुळे या गावांमध्येही चावडीवाचन करून ज्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले आहेत त्यांची माहिती दिली जाईल. तसेच आक्षेप स्वीकारले जातील. या प्रक्रियेला आणखी पाच दिवस लागतील. अशीच प्रक्रिया धुळे जिल्ह्यातील निवडणूक सुरू असलेल्या ११० ग्रामपंचायतींमध्ये १६ ऑक्‍टोबरनंतर होईल.

कर्जमाफीच्या याद्यांवर पाच तालुक्‍यांत आक्षेप
जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्यांचे वाचन सुरू झाले आहे. या याद्या लेखापरीक्षणानंतर तयार केल्यासून, त्यावर पाच तालुक्‍यांमध्ये ३९६ आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. जळगाव, पाचोरा, यावल, बोदवड व एरंडोल या तालुक्‍यांमध्ये हे आक्षेप आले आहेत. जिल्ह्यातील १२११ गावांमधून चार लाख ५४ हजार ७४८ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज  केले होते. यातील एक हजार ४६ गावांमधील तीन लाख ९६ हजार ५५९ नावांचे चावडीवाचन झाले आहे, अशी माहिती बुधवारी (ता. ११) सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिली. पडताळणीनंतर पंचनामा केला जात असून, त्यावर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, सरपंच व प्राधिकृत अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेतली जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...
मराठवाड्यातील ३२१ गावांना ३९६...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत...
मिरजगाव येथे यंत्रणा सुरळीत, मात्र... नगर : तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन...
नांदेड विभागातील २४ कारखान्यांचा गाळप... नांदेड :  नांदेड विभागातील यंदा गाळप सुरू...
व्यापाऱ्यांकडून फसवणूक : मनमाड बाजार...मनमाड, जि. नाशिक  : मनमाड कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव येथे आंबा ४५०० ते ८००० रुपये... जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृषिपंपांच्या वीज थकबाकीवरून...मुंबई  ः सुमारे २३ हजार कोटी रुपयांच्या कृषी...
आमदार-खासदारांची धोरणे व्यापारीहिताचीपरभणी  ः आमदार-खासदारांनी संघटित होऊन...
पीकविमा परताव्यासाठीचे अन्नत्याग आंदोलन...परभणी  ः जिल्ह्यातील पीकविमा परताव्यापासून...
गुजरातमध्ये उन्हाळी पीक लागवड क्षेत्रात...मुंबई : सरदार सरोवर प्रकल्पातील कमी ...
`जलयुक्त`साठी पुणे जिल्ह्यातील 221...पुणे  ः पाणीटंचाई कमी करण्यासाठी राज्य...
नगर जिल्ह्यात ‘नरेगा’तून साडेसहा हजार... नगर  ः ग्रामीण भागात मजुरांना रोजगार...
मराठवाड्यातील लघू प्रकल्पांत १४ टक्के... औरंगाबाद  : एकीकडे उष्णतेचे प्रमाण वाढत...
बुलडाण्यातील सात हजारांवर कृषिपंपांची... बुलडाणा  ः जिल्ह्यात सद्यःस्थितीत सात...
बुलडाण्यात सोयाबीन क्षेत्र वाढण्याची... बुलडाणा  ः गेल्या हंगामात बीटी कपाशीवर...
कोल्हापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम आटोपला कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप...
तीन लाख ७२ हजार टन खतसाठा तीन...परभणी :  नांदेड, परभणी, हिंगोली...