रशियाला द्राक्ष निर्यातीत ‘क्लिअरिंग’चा खोडा

रशियामध्ये द्राक्ष निर्यातदारांच्या अडचणींसंदर्भात सरकार कृषी विभाग, अपेडा यांच्याशी या प्रशांबाबत पाठपुरावा केला. मात्र हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. ज्या शेतकऱ्यांनी रशियासाठी द्राक्षे पाठविली आहेत. भविष्यात त्यांना पैसे मिळण्यास देखील अडचण निर्माण होणार आहे. - मधुकर क्षीरसागर, संचालक,महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे.
रशियाला द्राक्ष निर्यातीत ‘क्लिअरिंग’चा खोडा
रशियाला द्राक्ष निर्यातीत ‘क्लिअरिंग’चा खोडा

नाशिक : भारतीय द्राक्षाचा रशिया मोठा आयातदार आहे. मागील वर्षी निर्यातीत १८.१९ टक्के वाढ होऊन एकूण निर्यातीच्या १५ टक्के निर्यात रशियात झाली होती. परंतु या वर्षी रशियन  वनस्पती संगरोध विभाग (प्लांट कोरंटाईन बोर्ड)ने निर्यातदारांना कुठलीही पूर्वसूचना न देता तांत्रिक कारणे पुढे करत कामकाज संथ केले आहे. या दिरंगाईमुळे द्राक्ष कंटेनर क्लिअरिंग कामकाज गेल्या १५ दिवसांपासून ठप्प झाले आहे.  यंदाच्या हंगामात ऑक्टोबर महिन्यापासून ते जानेवारी महिन्यापर्यंत द्राक्ष कंटेनर क्लिअरिंगचे कामकाज दोन ते तीन दिवसांत पार पडले. मात्र कुठलीही पूर्वसूचना निर्णयादारांना न देता रशियातील सेंट पीटरबर्ग या बंदरावर द्राक्षाचे कंटेनर गेल्या दोन आठवड्यांपासून क्लिअर झालेले नाहीत. त्यामुळे निर्यातदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तेथील वनस्पती संगरोध विभागाचे (प्लांट कोरंटाईन बोर्ड) कामकाज संथ गतीने सुरू आहे. नियमांची अट घालून ते कामकाज २ आठवडे उशिरा करत आहेत. यामुळे काही निर्यातदारांनी तूर्तास द्राक्ष पाठविणे बंद केले आहे.  रशियन कस्टम विभागाकडून पेस्ट फ्री एरिया सर्टिफिकेटची मागणी होत असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अपेडा, कृषी विभाग यांनी यात लक्ष घालायची गरज आहे. याउलट दक्षिण आफ्रिकेमध्ये कंटेनर्स दोन ते तीन दिवसांत क्लिअर होत आहेत. भारतीय वाणिज्य मंत्रालयाने रशिया सरकारशी बोलून यात तडजोड करणे गरजेचे आहे. त्यामुळे चालू हंगामात आलेला व्यत्यय टाळून ताबडतोव कार्यवाही करणे आवश्यक आहे.  यापूर्वी श्रीलंकेने भारतीय द्राक्षांना एरिया फ्री या फायटो सॅनिटरी सर्टिफिकेटची अट घालून परवानगी नाकारली आहे. त्यामुळे येथील निर्यात बंद आहे. यामुळे मोठा फटका निर्यातदारांना बसला आहे. रशियासारख्या देशात जर निर्यात बंद झाली तर मोठा फटका बाजारभावावर बसण्याची शक्यता आहे. यासाठी वाणिज्य मंत्रालयाने या प्रकरणात विशेष लक्ष घालून समस्या सोडविणे गरजेचे आहे. जर एक आठवडा क्लिअरनिंग ठप्प झाली, तर २००० टन द्राक्ष पाठविण्यास विलंब होतो. यामुळे थेट परिणाम द्राक्ष उत्पादकांवर होत आहे. यामुळे हा प्रश्न वेळीच मार्गी लावून निर्यात व संबंधित कामे सुरळीत होणे गरजेचे आहे.  प्रतिक्रिया प्रत्येक देशाच्या वनस्पती संगरोध विभागाकडून (प्लांट कोरंटाईन बोर्ड) कीड, रोग यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या तपासण्या होत असतात. मात्र या हंगामात चालू महिन्यात अगदी काटेकोरपणे करून कामकाज सुरू आहे. त्यामुळे या कामात जास्त वेळ लागत आहे.  - विलास शिंदे, चेअरमन, सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी, मोहाडी, जि. नाशिक.

मुख्य हंगामामध्ये ही अडचण निर्माण झाली. त्यामुळे वाणिज्य मंत्रालय व अपेडा यांनी वेळेत लक्ष देऊन यातून पर्याय काढावा. जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळेल.  - राजाराम सांगळे,  द्राक्ष निर्यातदार, नाशिक. 

रशियामध्ये द्राक्षासाठी मोठी मागणी आहे. मात्र सध्या पेस्ट फ्री एरिया सर्टिफिकेटची मागणी कस्टम विभागाकडून होत आहे. याकामी द्राक्ष बागायतदार संघाने लक्ष घातले आहे. जर याची पूर्तता झाली तर द्राक्ष निर्यात पहिल्यासारखी सुरळीत होईल. द्राक्ष निर्यातदारांसमोरील अडचण दूर होईल.  - कैलास भोसले, खजिनदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com