agriculture news in Marathi, problems in online 7/12, Maharashtra | Agrowon

ऑनलाइन सातबारा निघेना; तलाठी हस्तलिखित देईना
गणेश कोरे
सोमवार, 30 जुलै 2018

एकीकडे पात्र लाभार्थींनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासन करत आहे. दुसरीकडे सदोष यंत्रणेचा लाभार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- गहिनीनाथ डोंगरे, माजी सरपंच, गुनाट
 

पुणेः आॅनलाइन सातबारा उताऱ्यावर तलाठ्यांची संगणकीय सही उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांना विविध याेजनांपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तलाठी व त्यांचे संगणकीय कर्मचारी सातबारा उताऱ्याची संगणकीय प्रिंट तलाठी कार्यालयातच काढण्याची सक्ती करत असल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप होत आहे. अनेकवेळा तलाठीच कार्यालयामध्ये उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. 

जिल्ह्यात अनेकवेळा महाभूलेखचा सर्व्हर डाउन असल्याने ऑनलाइन सातबारा उतारा मिळणे कठीण झाले आहे. त्यातच हस्तलिखित उतारे देणे सरकारने बंद केल्याने जिल्हा परिषदेच्या योजनांपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्‍यता आहे. जिल्हा परिषदेच्या विविध याेजनांसह, राज्य शासनाच्या याेजनांच्या अर्जासाठी आणि पीककर्ज, पीकविमा यासाठी संगणकीय सातबारा उताऱ्याची सक्ती करण्यात आली आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना स्वमालकीचा सातबारा उतारा असणे ही मुख्य अट आहे. त्याशिवाय सद्यस्थितीत पीकविमा भरणे, तसेच पीककर्जाचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा गरजेचा आहे.

मात्र, मागील काही दिवसांपासून संबंधित महाभूलेख या वेबसाइटचा सर्व्हर डाउन आहे. चालू झाला तर त्याची गती अत्यंत धीमी असते, त्यामुळे सातबारा उतारा काढणे दिव्य होऊन बसले आहे. सातबारा उताऱ्यासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी अनेकदा हेलपाटे मारूनही सातबारा उतारे निघत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

तलाठ्याविना कामाचा खोळंबा
महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) तालुक्‍यातील चास येथील तलाठी गेल्या दोन महिन्यांपासून गावातील कार्यालयात येत नाही. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांपासून लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत असल्याची तक्रार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाजीराव बारवे यांनी केली. 

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कर्ज प्रकरणासाठी आणि पुणे जिल्हा परिषदेच्या विविध वैयक्तिक योजनेसाठी आवश्‍यक असलेले सातबारा उतारे ऑनलाइन मिळत नाहीत. त्यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. त्यातच गावकामगार तलाठी कार्यालयात येत नसल्याने शेतकऱ्यांचा खोळंबा होत आहे. अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऑनलाइन सातबारा उताऱ्याची कामे सुरू आहेत, तेथे तलाठी असतात. त्यामुळे चास येथून सह्या घेण्यासाठी अनेक नागरिकांना अवसरी खुर्द येथे यावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. 

प्रतिक्रिया
सद्यःस्थितीत संबंधित वेबसाइट बंद असल्याने सरकारने शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पीकविमा भरण्यासाठी तसेच जिल्हा परिषद योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारने मुदत वाढवून द्यावी. 
-बापूसाहेब शिवले, तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना, शिरूर

एनआयसी या संस्थेकडून संबंधित वेबसाइटमध्ये तांत्रिक सुधारणा करण्यात येत आहेत; लवकरच ही यंत्रणा पूर्ववत होईल.
-रणजित भोसले, तहसीलदार, शिरूर.

 

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...