शेतमाल विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणीत सातबाराचा खोडा
अभिजित डाके
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

सांगली ः शेतीमाल हमीभावाने खरेदीसाठी सांगली, इस्लामपूर, तासगाव बाजार समितीत ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणीसाठी सातबारावर पीक पेऱ्याची नोंदणी केलेली आवश्‍यक असल्याने शेतकरी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. ‘‘पीक उतारा जानेवारीमध्ये मिळणार आहे’’ असे उत्तर तलाठी देत आहेत. त्यामुळे आॅनलाइन नोंदणीत सातबाराचा खोडा असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. 

सांगली ः शेतीमाल हमीभावाने खरेदीसाठी सांगली, इस्लामपूर, तासगाव बाजार समितीत ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणीसाठी सातबारावर पीक पेऱ्याची नोंदणी केलेली आवश्‍यक असल्याने शेतकरी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. ‘‘पीक उतारा जानेवारीमध्ये मिळणार आहे’’ असे उत्तर तलाठी देत आहेत. त्यामुळे आॅनलाइन नोंदणीत सातबाराचा खोडा असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. 

सोयाबीन, मगू, उडीदाची आवक बाजारात वाढत असतानाच दर घसरले. त्यामुळे शासनाने हमीभावाने खरेदीची प्रक्रिया सुरू केली. सांगली बाजार समितीत दोन दिवसांपूर्वी तर इस्लामपूर आणि तासगाव तालुक्‍यात बुधवारी (ता.११) पासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. मात्र, नोंदणीसाठी सातबारा अावश्‍यक असून पिकांची नोंद असल्यासच नोंदणी केली जाणार आहे.

शेतकऱ्यांनी सातबारावर पिकाची नोंद केली आहे. नोंदणी लवकर व्हावी, यासाठी शेतकरी तलाठी कार्यालयात सातबारा घेण्यासाठी जात आहेत. मात्र, तलाठी कार्यालयात गेल्यानंतर सातबारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. ‘‘पीक उतारा जानेवारीमध्ये मिळणार आहे’’ असे उत्तर तलाठी देत आहेत. त्यामुळे आता शेतीमाल विक्री कसा करायचा असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर धान्याची हमीभावात विक्री करता येणार आहे. ‘‘नोंदणी झाल्यानंतर नाफेड विभाग प्रत्येक शेतकऱ्याशी संपर्क करून तुमचे धान्य विक्रीसाठी घेऊन या’’ असादेखील निरोप देणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर धान्याची विक्री व्हावी, अशी यासाठी शेतकरी नियोजन करू लागले आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे
शेतकऱ्यांनी उडीद, मुगाची काढणी केलेली आहे. खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट पाहत होते. खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. त्यात दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे उडीद, मूग विक्री करून दोन पैसे दिवाळीच्या खर्चासाठी होतील या आशेने शेतकरी नोंदणीसाठी पुढे येत आहेत. मात्र, सातबाराच मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सातबारा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...