agriculture news in marathi, Proceedings of crop loan waiver in Buldana district | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात पीक कर्जमाफीची कार्यवाही सुरू
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

बुलडाणा  :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत व्यापारी, ग्रामीण, खाजगी व सहकारी बँकांकडील पीक कर्जास विहित निकषानुसार माफी देण्याची कार्यवाही सुरू आहे. ज्या खातेदारांना कर्जमाफी योजनेतंर्गत लाभ मिळालेला आहे, अशा लाभार्थ्यांनी बँकेशी संपर्क करून त्यांना मिळालेल्या लाभाबाबत खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

बुलडाणा  :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत व्यापारी, ग्रामीण, खाजगी व सहकारी बँकांकडील पीक कर्जास विहित निकषानुसार माफी देण्याची कार्यवाही सुरू आहे. ज्या खातेदारांना कर्जमाफी योजनेतंर्गत लाभ मिळालेला आहे, अशा लाभार्थ्यांनी बँकेशी संपर्क करून त्यांना मिळालेल्या लाभाबाबत खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या शिफारशीनुसार राज्यातील व्यापारी बॅकांकडून पीककर्ज घेतलेल्या व कर्ज खाते एनपीए अर्थात अनुत्पादक जिंदगी म्हणून वर्गीकृत करण्यात आलेल्या खातेदारांना शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता शासन व बँकांच्या परस्पर समझोत्यानुसार एकरकमी परतफेड योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेच्या निकषानुसार सहकार खात्याकडून पात्र ठरविण्यात आलेल्या पीक कर्ज खात्यांनाच ही योजना लागू होणार आहे. प्रत्येक अनुत्पादक खात्याच्या थकीत शिल्लक मुद्दलनुसार त्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार खात्यावरील थकीत शिल्लक अर्थात मुद्दलनुसार एकरकमी परतफेडीची पात्र रक्कम असणार आहे.

बँकेस किमान अपेक्षित वसुलीबाबतचे प्रमाण निश्चित करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे ३१ जुलै २०१७  च्या स्थितीवरील एनपीए कर्ज थकीत शिल्लकेच्या ८५ टक्के असणार आहे. तसेच ३१ मार्च २०१६ च्या स्थितीवरील एनपीए कर्ज थकीत शिलकेच्या ७० टक्के, त्यापुढे ३१ मार्च २०१५ च्या स्थितीवरील एनपीए कर्ज थकीत शिलकेच्या ५५ टक्के, ३१ मार्च २०१४ च्या स्थितीवरील एनपीए कर्ज थकीत शिलकेच्या ४५ टक्के आणि ३१ मार्च २०१३ च्या स्थितीवरील एनपीए कर्ज थकीत शिलकेच्या ३५ टक्के पात्र असणार आहे.

इतर बातम्या
सागरी नत्र साखळीतील महत्त्वाच्या...सागरी पाण्यातील अमोनिया ऑक्सिडेशन करणारे...
औरंगाबादेत कामगारांची निदर्शने औरंगाबाद : बाजार समितीमधून हमाल-मापाड्यांची...
पुणे जिल्ह्यात ३७ लाख ३३ हजार टन ऊस...पुणे ः पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा गळीत...
नांदेड विभागात २८ लाख क्विंटल साखरेचे...नांदेड ः नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री...जत, जि. सांगली ः तुबची बबलेश्वर (कर्नाटक)...
नाशिक जिल्ह्यात १५ लाख टन चारा उपलब्ध...नाशिक : राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि मागणी...
बुलडाण्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...बुलडाणा ः कमी पावसामुळे जिल्ह्यात शासनाने यावर्षी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२००...सोलापुरात सर्वाधिक दर ८०० रुपये सोलापूर ः...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा...बुलडाणा ः सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे...
चवगोंडा पाटील, सौरभ कोकीळ, मारुती शिंदे...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
राज्यात थंडीत चढउतारपुणे : छत्तीसगडचा दक्षिण भाग, तेलंगणा आणि...
नाशिक जिल्ह्यातील माती परीक्षणासाठी ‘...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेती, गावतळे, जलसंपदा,...
जेजुरीत कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांची...जेजुरी, जि. पुणे : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त...
पीककर्जासाठी उपोषणकर्त्या शेतकऱ्याचे...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्रीजळगाव  : खानदेशात पपई उत्पादकांना सव्वाआठ...
दोन टप्प्यांत ‘एफआरपी’ला विरोधसातारा : साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता...
केळी दरांची अंमलबजावणी होईनाजळगाव : खानदेशात केळीच्या दरांबाबत दबाव...