agriculture news in Marathi, Process of 9 thousand tons of grapes in Sulayy Viniards | Agrowon

सुला विनियार्ड्समध्ये ९ हजार टन द्राक्षांवर प्रक्रिया
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 मे 2019

नाशिक : देशातील आघाडीच्या वाइन उत्पादक असलेल्या सुला विनियार्ड्सतर्फे या वर्षीच्या हंगामात ९ हजार टन वायनरी द्राक्षांवर प्रक्रिया करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या प्रक्रियेच्या तुलनेत यावर्षी तब्बल ५० टक्‍क्यांनी वाढ झालेली आहे. द्राक्ष लागवडीसाठी असलेल्या पोषक वातावरणामुळे हे शक्य झाले आहे. मोठ्या प्रमाणावर द्राक्षांवर प्रक्रिया झाल्याने सुलातर्फे २०१९ मध्ये जगभरात १ मिलियन वाइन केस विक्रीचा विक्रम या वर्षी मोडीस निघणार आहे.

नाशिक : देशातील आघाडीच्या वाइन उत्पादक असलेल्या सुला विनियार्ड्सतर्फे या वर्षीच्या हंगामात ९ हजार टन वायनरी द्राक्षांवर प्रक्रिया करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या प्रक्रियेच्या तुलनेत यावर्षी तब्बल ५० टक्‍क्यांनी वाढ झालेली आहे. द्राक्ष लागवडीसाठी असलेल्या पोषक वातावरणामुळे हे शक्य झाले आहे. मोठ्या प्रमाणावर द्राक्षांवर प्रक्रिया झाल्याने सुलातर्फे २०१९ मध्ये जगभरात १ मिलियन वाइन केस विक्रीचा विक्रम या वर्षी मोडीस निघणार आहे.

महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये ५१० शेतकऱ्यांशी करार पद्धतीने शेती केली आहे. या वर्षांत अतिरिक्त ३४० एकरमध्ये नव्याने लागवड केली जाणार असून या माध्यमातून सुलाचे द्राक्ष लागवडीचे क्षेत्र तीन हजार एकरवर पोचणार आहे. येथे मोठ्या प्रमाणावर वाइनच्या द्राक्षांची लागवड केली जात असून याद्वारे कृषी क्षेत्राला बळ दिले जात आहे. वाइन द्राक्षांवर प्रक्रिया करताना विविधतेचा विचार केला गेला. बहुतांश द्राक्षांवर नाशिक आणि दक्षिण महाराष्ट्रासह कर्नाटक येथेही प्रक्रिया करण्यात आली. यंदाचा हंगाम द्राक्ष लागवडीसाठी पोषक राहिला. वातावरणातील बदलामुळे छाटणीला उशिराने म्हणजे डिसेंबरच्या मध्यावर सुरवात झाली. छाटणीचा हंगाम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालला. भारताच्या द्राक्ष उत्पादनाचे केंद्रस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्याचा वाटा १.४३ लाख टन द्राक्षांच्या पलीकडे गेला आहे.

वाइन द्राक्षांच्या टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर
वाइननिर्मिती ही जुनी प्रक्रिया आहे. पारंपरिक उत्पादन आणि प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर टाकाऊ पदार्थनिर्मित होत असतात. यातील बियांपासून पापुद्रा योग्य रीतीने वापरून घेतो. द्राक्षांवर प्रक्रिया केल्यानंतर बियांपासून तेल अर्थात ग्रेप सीड ऑईल तयार केले जाते. उर्वरित चोथा खतनिर्मितीसाठी वापरला जातो, अशी माहिती सुला विनियार्ड्सचे संस्थापक व सीईओ राजीव सामंत यांनी दिली.

यंदा विविधतेचा विचार केल्यास सुमारे ५५ टक्के काळे द्राक्ष (रेड व्हरायटी ग्रेप्स) तर उर्वरित ४५ टक्के साधे द्राक्ष (व्हाईट ग्रेप्स) वर प्रक्रिया करण्यात आली. २०१९ हे वर्ष सकारात्मक राहिले.
- करण वासानी, वरिष्ठ उपाध्यक्ष- विनियार्डस आणि वाइन ऑपरेशन्स, सुला वाइन्स
 

इतर ताज्या घडामोडी
अडगाव बुद्रुक येथे केली एचटीबीटी बियाणे...अकोला : अडगाव बुद्रुक (ता. तेल्हारा) येथे सोमवारी...
ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी नियोजनग्रामीण भागात जलसंधारण जर यशस्वीपणे दीर्घकाळ...
बदलत्या वातावरणाने घटेल भाताचे उत्पादन...भारतामध्ये वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या...
नगर जिल्ह्यात  ‘उन्नत शेती’बाबत...नगर ः शेतकऱ्यांना अवजारांचा लाभ मिळण्यासाठी...
मराठवाड्यातील १९८ मंडळांत पाऊसऔरंगाबाद  : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर...
धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत...जळगाव : खानदेशात धुळे जिल्ह्यासह जळगाव,...
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब लागवड मोठ्या...
सांगली जिल्ह्यात पाऊस बरसलासांगली : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) ठिकठिकाणी...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई : युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी...
सोलापुरात पाऊस; पण जोर कमीसोलापूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) रात्री...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई  ः युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे...
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज...आळंदी, जि. पुणे  ः  सुखालागी जरी करिसी...
विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम...मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ....
पुणे जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात...पुणे   : दुष्काळाने होरपळत असलेल्या...
‘जलयुक्त’मधील गैरव्यवहाराची ‘एसीबी’...मुंबई  ः राज्यात जलयुक्त शिवार अभियानातील...
जळगावात भाजीपाला आवकेत घटजळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
पुणे जिल्ह्यात २२० हेक्टरवर भातपीक...पुणे  ः यंदाच्या खरिपात भात उत्पादनवाढीसाठी...
टाटा-कोयनेचे पाणी वळवू नकाः भावे...पुणे  : टाटा व कोयना धरणातील ११५ टीएमसी पाणी...
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...