दुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणी

महाराष्ट्रासाठी दुष्काळ सहनशील अशा १८ वाणांची चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाणांची उत्पादकता प्रतिहेक्टरी १२० टन आहे. आठ महिन्यांत येणाऱ्या या वाणाचा साखऱ उतारा १० टक्के आहे. - बक्षी राम, संचालक, ऊस पैदास संस्था
ऊस वाण
ऊस वाण

नवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर येणाऱ्या आणि दुष्काळ सहनशील असे १८ वाण विकसित करण्यात आले आहे. या वाणांची चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) ऊस पैदास संस्थेचे संचालक बक्षी राम यांनी दिली. सीओ ०२३८ या वाणाची चाचणी महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांध्येही करण्यात आली होती. परंतु, उत्तर प्रदेशप्रमाणे येथे निष्कर्ष आले नाहीत. येथे फुलोऱ्याची समस्या निर्माण झाली होती. दोन महिने फुलोरा आल्यास साखर उतारा आपोआप कमी होत जातो. त्यामुळे तमिळनाडूत सीओ ११०१५ या वाणाची चाचणी करण्यात आली.    ‘‘महाराष्ट्रासाठी ऊस पैदास संस्थेने दुष्काळ सहनशील असे १८ वाण विकसित केले आहेत. हे वाणांची चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही सध्या महाराष्ट्रात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सोबत (व्हीएसआय) सहा ठिकाणी या वाण्यांची चाचणी घेत आहोत. विकसित केलेल्या आणि चाचणी सुरू असलेल्या वाणांची उत्पादकता प्रतिहेक्टरी १२० टन आहे. आठ महिन्यांत येणाऱ्या या वाणाचा साखऱ उतारा १० टक्के आहे. चाचणीची प्रक्रिया येत्या महिनाभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आकडेवारी गोळा करण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे,,’’ असे बक्षी राम म्हणाले. उत्तर प्रदेशात प्रसार बक्षी राम यांनी स्वतः सीओ ०२३८ हे वाण विकसित केले आहे. लवकर येणाऱ्या आणि जास्त उत्पादकता असलेल्या सीओ ०२३८ या वाणाचा उत्तर प्रदेशात विक्रमी साखर उत्पादन होण्यात मोठा वाटा आहे. उत्तर प्रदेशात जवळपास ६० टक्के क्षेत्रावर या वाणाची लागवड होते. ‘‘जास्त ऊस उत्पादकता आणि चांगला साखर उतारा दर यामुळे शेतकरी आणि कारखानदारांनीही या वाणाला पसंती दिली आहे. त्यामुळे या वाणाचा जास्त क्षेत्रावर प्रसार झाला आहे,’’ असे उत्तर प्रदेश ऊस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com