शेवग्याची पाने अाणि शेंगा दोन्हीवर प्रक्रिया करुन विविध पदार्थ बनवता येतात.
शेवग्याची पाने अाणि शेंगा दोन्हीवर प्रक्रिया करुन विविध पदार्थ बनवता येतात.

शेवग्याच्या पानापासून पराठा, चहा

आहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व झाडाची पाने हे पौष्टिकतेत अतिशय समृद्ध आहेत. शेवग्याच्या पाल्यामध्ये संत्र्याच्या सातपटीने अधिक जीवनसत्त्व ‘क’ आहे. ग्रामीण भागात शेवग्याच्या शेंगा अाणि पाला सहज उपलब्ध होतो. शेंगा अाणि पाल्यावर प्रक्रिया करून विविध पाैष्टिक पदार्थ तयार करून चांगला रोजगार मिळवता येतो.   शेवग्यामध्ये दुधापेक्षा अधिक प्रथिने व गाजराहून जास्त पटीने बिटाकॅरोटिन आहे. म्हणूनच शेवग्याला ‘पॉवर हाउस ऑफ मिनरल्स' म्हटले जाते. शेवग्याच्या शेंगेतही जीवनसत्व ‘क’ कॅरोटिन, कॅल्शियम व फॉस्फरस ही पोषकतत्त्वे आहेत. शेवग्याची शेंग ही गर्भवती व वाढीच्या मुलांसाठी उत्तम भाजी आहे. शेवग्याने रक्तशुद्धीकरणाचे कार्यसुद्धा होते. तसेच ज्यांना कफाचा त्रास आहे (दमा, जुनाट खोकला) अशांनी शेवगा नियमित खावा. यकृत, प्लिहा यांचे आजार असणाऱ्यांना शेवग्याचे सूप द्यावे. १०० ग्रॅम शेवग्याच्या शेंगेत निव्वळ ०.१ टक्के चरबी असून चोथ्याचे (तंतू) प्रमाण मात्र चांगले आहे. यामुळे अनेक अाजारांमध्ये (हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब) शेवगा उपयोगी ठरतो. १. शेवग्याच्या पानाचा पराठा

  • अावश्‍यक घटक ः शेवग्याची पाने ५० ग्रॅम, कणीक (गव्हाचे पीठ) ५० ग्रॅम, सोया पीठ २५ ग्रॅम, ज्वारीचे पीठ २५ ग्रॅम, बेसन २५ ग्रॅम, हळद, मिरची ५ ग्रॅम, जिरे, ओवा व इतर मसाला चिमूटभर, मीठ चवीपुरते.
  • शेवग्याचा पाला स्वच्छ धुवून घ्यावा.
  • गव्हाचे पीठ, सोया पीठ, ज्वारी पीठ, बेसन व वरील सर्व मसाले त्या पिठात मिसळून एकजीव करावे.
  • शेवग्याचा पाला न कापता पीठामध्ये मिसळून पीठ मळून घ्यावे.
  • नेहमीसारखे पराठे भाजून घ्यावे.
  • खाताना पराठ्यासोबत मिरचीचा ठेचा व दही द्यावे.
  • २. शेवग्याच्या पानाचा चहा

  • शेवग्याची पाने तोडून स्वच्छ धुऊन घ्यावीत.
  • पाने सावलीत वाळवून मिक्‍सरमधून चहा पूडप्रमाणे बारीक करावीत.
  • चहाच्या बॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यावे.
  • एका भांड्यात पाणी गरम करून त्यात शेवग्याच्या पानाची पावडर मिसळावी.
  • या पाण्यामध्ये साखर मिसळून उकळून घ्यावे.
  • - चहा गाळल्यानंतर त्यात लिंबू रस मिसळून प्यावे.
  • ३. लोणचे

  • अावश्‍यक घटक ः शेवग्याच्या शेंगा १५ नग, मेथीचे दाणे १ टेबलस्पून (चहाचे चमचे), मोहरी ३ टेबलस्पून (चहाचे चमचे), काळे मिरे २०, हिंग - पाव टीस्पून (चहाचे चमचे), हळद पावडर १ टेबलस्पून (चहाचे चमचे), चिंच १०० ग्रॅम, व्हिनेगर २ टेबलस्पून (मोठे चमचे) लसूण, मीठ ३ मोठे चमचे, तेल १ कप, तिळाचे तेल २ मोठे चमचे.
  • सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगांवरील साल थोड्या प्रमाणात हाताने काढून शेंगाचे छोटे तुकडे करावेत.
  • ५ मिनिटे शेंगा वाफवून घ्याव्यात.
  • मेथी, मोहरी, मिरची पावडर व चिंचेची पेस्ट तयार करावी.
  • कढईत तेल गरम करून त्यात लसूण, हिंग, मीठ, हळद व वरील तयार केलेली पेस्ट चांगली एकजीव करून घ्यावी.
  • चांगले शिजल्यावर वाफवलेल्या शेंगा त्यात घालून कमी आचेवर ५-७ मिनिटे शिजवून घ्याव्यात.
  • गॅस बंद करून कढई खाली उतरवून थंड करून त्यात व्हिनेगर व तिळाचे तेल मिसळावे.
  • तयार लोणचे निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरून ठेवावे.
  • इमेल ः pckvkmau@gmail.com (लेखिका कृषी विज्ञान केंद्र, अाैरंगाबाद येथे कार्यक्रम समन्वयक म्हणून कार्यरत अाहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com