हळदकंदांवर प्रक्रियेसाठी सुधारित तंत्रज्ञान फायद्याचे

पारंपरिक पद्धतीचा अवलंब केल्यास हळदीमध्ये अनेक त्रुटी राहतात
पारंपरिक पद्धतीचा अवलंब केल्यास हळदीमध्ये अनेक त्रुटी राहतात

हळदकंदांची काढणी केल्यानंतर हळदीवर प्रक्रिया करून हळद भुकटीची निर्मिती केली जाते. मात्र या प्रक्रियेत हळदकंद शिजविणे, सुकविणे आदी क्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी पारंपरिक पद्धतीचा अवलंब केल्यास हळदीमध्ये अनेक त्रुटी राहतात. त्यामुळे आधुनिक शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करावा.

कच्च्या हळदीला बाजारपेठेमध्ये फारशी मागणी नसते. फक्त लोणचे तयार करण्यासाठी थोडीफार ओली हळद खरेदी केली जाते.

हळद प्रक्रियेतील टप्पे :

  • हळद प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने हळदीचे कंद शिजविणे, वाळविणे आणि त्यांना आकर्षक पिवळा रंग येण्यासाठी पॉलिश करणे या बाबींचा समावेश होतो.
  • हळदीचे कंद जमिनीमधून काढल्यानंतर त्याची मोडणी करून मातृकंद, बगलगड्डे आणि हळकुंडे वेगळे करावेत. त्यानंतर हळद शिजवावी. हळद जमिनीतून काढल्यावर शक्‍य तेवढ्या लवकर हळद शिजविण्याची प्रक्रिया करावी.
  • हळद शिजविण्याची गरज :

  • हळदीमध्ये असलेले कुरकुमीन (पिवळेपणास कारणीभूत घटक) सर्व हळकुंडांमध्ये एकसारखे पसरण्यासाठी.
  • हळद शिजविल्याने तिच्या सालीमध्ये असलेली लहान छिद्रे उघडी होऊन साल मऊ होते. त्यामुळे हळद लवकर सुकते.
  • हळदीची पुनरोत्पादन शक्ती नष्ट करणे.
  • हळदीमध्ये येत असलेला उग्रवास नष्ट करणे.
  • हळद शिजविण्याच्या पद्धती : पारंपरिक पद्धत :  या पद्धतीमध्ये गूळ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे चुलवान वापरले जाते. हळद कायलीमध्ये शिजवली जाते. या पद्धतीमध्ये प्रामुख्याने आठ ते दहा क्विंटल क्षमतेच्या कायलीचा वापर केला जातो. कायलीमध्ये हळद सपाट, शंकवाकृती भरून किंवा तिचा ढीग लावून त्यावर हळदीचा पाला टाकून त्यावर गोणपाट टाकतात. त्यामुळे पाण्याची वाफ बाहेर जात नाही. हळद शिजल्यानंतर पाणी तोटीने बाहेर काढले जाते. नंतर हळद बाहेर काढली जाते.

    त्रुटी :

  • या पद्धतीमध्ये हळद आणि पाणी यांचा संपर्क येत असल्याने हळदीमधील कुरकुमीनचे प्रमाण पाण्यामध्ये उतरते. त्यामुळे हळदीची प्रत खालावते.
  • या पद्धतीमध्ये एक एकरमधील हळद शिजविण्यासाठी ३ ते ४ दिवस लागतात. कायलीमध्ये शीग लावल्यामुळे खालील हळद लवकर शिजते तर वरची हळद अर्धकच्ची राहते.
  • हळकुंडास चिकटलेला मातीचा थर कायलीच्या तळाशी साचून त्या थरातील हळद जास्त शिजते व करपण्याची शक्‍यता असते.
  • या पद्धतीत प्रत्येक वेळी गरम पाणी बाहेर सोडून दुसऱ्या कायलीच्या वेळी थंड पाणी टाकावे लागते. परिणामी वेळ आणि इंधन मोठ्या प्रमाणात वाया जातो.
  • संपर्क : डॉ. जितेंद्र कदम, ९८२२४४९७८९ (काढणीपश्‍चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था,रोहा, जि. रायगड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com