agriculture news in marathi, processing on turmeric | Agrowon

हळदकंदांवर प्रक्रियेसाठी सुधारित तंत्रज्ञान फायद्याचे
डॉ. जितेंद्र कदम, डॉ. केशव पुजारी
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

हळदकंदांची काढणी केल्यानंतर हळदीवर प्रक्रिया करून हळद भुकटीची निर्मिती केली जाते. मात्र या प्रक्रियेत हळदकंद शिजविणे, सुकविणे आदी क्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी पारंपरिक पद्धतीचा अवलंब केल्यास हळदीमध्ये अनेक त्रुटी राहतात. त्यामुळे आधुनिक शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करावा.

कच्च्या हळदीला बाजारपेठेमध्ये फारशी मागणी नसते. फक्त लोणचे तयार करण्यासाठी थोडीफार ओली हळद खरेदी केली जाते.

हळद प्रक्रियेतील टप्पे :

हळदकंदांची काढणी केल्यानंतर हळदीवर प्रक्रिया करून हळद भुकटीची निर्मिती केली जाते. मात्र या प्रक्रियेत हळदकंद शिजविणे, सुकविणे आदी क्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी पारंपरिक पद्धतीचा अवलंब केल्यास हळदीमध्ये अनेक त्रुटी राहतात. त्यामुळे आधुनिक शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करावा.

कच्च्या हळदीला बाजारपेठेमध्ये फारशी मागणी नसते. फक्त लोणचे तयार करण्यासाठी थोडीफार ओली हळद खरेदी केली जाते.

हळद प्रक्रियेतील टप्पे :

  • हळद प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने हळदीचे कंद शिजविणे, वाळविणे आणि त्यांना आकर्षक पिवळा रंग येण्यासाठी पॉलिश करणे या बाबींचा समावेश होतो.
  • हळदीचे कंद जमिनीमधून काढल्यानंतर त्याची मोडणी करून मातृकंद, बगलगड्डे आणि हळकुंडे वेगळे करावेत. त्यानंतर हळद शिजवावी. हळद जमिनीतून काढल्यावर शक्‍य तेवढ्या लवकर हळद शिजविण्याची प्रक्रिया करावी.

हळद शिजविण्याची गरज :

  • हळदीमध्ये असलेले कुरकुमीन (पिवळेपणास कारणीभूत घटक) सर्व हळकुंडांमध्ये एकसारखे पसरण्यासाठी.
  • हळद शिजविल्याने तिच्या सालीमध्ये असलेली लहान छिद्रे उघडी होऊन साल मऊ होते. त्यामुळे हळद लवकर सुकते.
  • हळदीची पुनरोत्पादन शक्ती नष्ट करणे.
  • हळदीमध्ये येत असलेला उग्रवास नष्ट करणे.

हळद शिजविण्याच्या पद्धती :
पारंपरिक पद्धत : 
या पद्धतीमध्ये गूळ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे चुलवान वापरले जाते. हळद कायलीमध्ये शिजवली जाते. या पद्धतीमध्ये प्रामुख्याने आठ ते दहा क्विंटल क्षमतेच्या कायलीचा वापर केला जातो. कायलीमध्ये हळद सपाट, शंकवाकृती भरून किंवा तिचा ढीग लावून त्यावर हळदीचा पाला टाकून त्यावर गोणपाट टाकतात. त्यामुळे पाण्याची वाफ बाहेर जात नाही. हळद शिजल्यानंतर पाणी तोटीने बाहेर काढले जाते. नंतर हळद बाहेर काढली जाते.

त्रुटी :

  • या पद्धतीमध्ये हळद आणि पाणी यांचा संपर्क येत असल्याने हळदीमधील कुरकुमीनचे प्रमाण पाण्यामध्ये उतरते. त्यामुळे हळदीची प्रत खालावते.
  • या पद्धतीमध्ये एक एकरमधील हळद शिजविण्यासाठी ३ ते ४ दिवस लागतात. कायलीमध्ये शीग लावल्यामुळे खालील हळद लवकर शिजते तर वरची हळद अर्धकच्ची राहते.
  • हळकुंडास चिकटलेला मातीचा थर कायलीच्या तळाशी साचून त्या थरातील हळद जास्त शिजते व करपण्याची शक्‍यता असते.
  • या पद्धतीत प्रत्येक वेळी गरम पाणी बाहेर सोडून दुसऱ्या कायलीच्या वेळी थंड पाणी टाकावे लागते. परिणामी वेळ आणि इंधन मोठ्या प्रमाणात वाया जातो.

संपर्क : डॉ. जितेंद्र कदम, ९८२२४४९७८९
(काढणीपश्‍चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था,रोहा, जि. रायगड)

फोटो गॅलरी

इतर मसाला पिके
मिरचीवरील किडींचा प्रादुर्भाव ओळखा,...मिरची पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडींमध्ये कळी-...
मिरची रोपवाटिकेतील पीक संरक्षणसध्या अनेक ठिकाणी रोपवाटिका ते फळे लागण्याच्या...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
हळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...
सुधारित पद्धतीने हळदीची काढणीहळद काढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
हळदीवरील रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...
हळदीवरील किडीचे करा वेळीच नियंत्रण हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...
मसाला पिकांना द्या पुरेसे पाणीमसाला पिकांना पाण्याचा ताण सहन होत नाही, हे...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...
हळद पिकातील रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
हळद पिकातील कीड नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
हळदीची भरणी आवश्यक...सध्याच्या काळात हळदीचे खोड तसेच फुटव्यांची वाढ...
पानवेल लागवडीसाठी जोमदार बेणे निवडापानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी, रेती...
पानवेल लागवडीपूर्वीची तयारी...ज्या शेतकऱ्यांना नवीन पानमळ्याची लागवड करावयाची...
काळी मिरी कशी तयार करतात?काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...
मसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधीमसाले व त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थांना...
गादीवाफ्यावर करा आले लागवडआले लागवड करण्यापूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादीवाफा...
मसाला पिकांची लागवड कशी करावी?नारळाची लागवड ७.५ x ७.५ मीटर अंतरावर करावी. या...